सांगलीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
सांगली,(प्रतिनिधी) दि.24 :- बदलापूर प्रकरणामुळे सध्या राज्यात संतापाची लाट उसळी आहे अशातच सांगलीतील संजय नगर परिसरात एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.
शेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर काल शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास लैंगिक अत्याचार केला आणी कोणाला सांगू नको अशी धमकी संजय प्रकाश माने (वय 30) या संशयित आरोपीने पीडित मुलीस दिली.
यानंतर त्या पीडित मुलीने आज शनिवारी सकाळी तिच्या आईस सर्व हकीकत सांगितली. या घटनेनंतर मुलीसह त्याच्या आईने घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. दिलेल्या तक्रारीनंतर संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे व त्यांच्या पथकाने दीड तासात आरोपीस पकडले व पोक्सो अंतर्गत कायद्यानुसार अल्पवयीन मुलीचे लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील वैद्यकीय तपासासाठी पिडीत मुलीला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यावेळी संजय नगर पोलीस ठाण्यासमोर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी करून आरोपीला फाशी देण्याची मागणी केली.