Home कोल्हापूर जिल्हा आई हे संस्काराचे विद्यापीठ असते- हभप भिसे ; एबीपी शिक्षण समूहामध्ये स्वर्गीय...

आई हे संस्काराचे विद्यापीठ असते- हभप भिसे ; एबीपी शिक्षण समूहामध्ये स्वर्गीय कांचन पाटील यांच्या जयंती निमित्त व्याख्यान

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

आई हे संस्काराचे विद्यापीठ असते- हभप भिसे ; एबीपी शिक्षण समूहामध्ये स्वर्गीय कांचन पाटील यांच्या जयंती निमित्त व्याख्यान

 

 

 

नवे पारगांव :- ‘आई हे संस्काराचे विद्यापीठ असते,तिने केलेल्या संस्काराची शिदोरी आयुष्यभर आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवते’,असे प्रतिपादन संत साहित्य अभ्यासक हभप स्वामीराज सुर्यकांत भिसे यांनी नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील एबीपी शिक्षण समुहामध्ये स्व.कांचनमाई अशोक पाटील यांच्या ६८ व्या जयंतीनिमीत्त आयोजित व्याख्यान प्रसंगी केले.

Advertisements

एबीपी शिक्षण समुहाच्या आधारवड स्वर्गीय कांचन पाटील यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी संत साहित्य अभ्यासक ह.भ.प स्वामीराज सूर्यकांत भिसे यांचे “आई ” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केलेले होते यावेळी विविध थोर पुरुषांच्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना आईचे महत्व पटवून दिले.यावेळी एबीपी शिक्षण समुह संस्थेच्या प्रांगणामध्ये मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण झाले.याशिवाय वक्तृत्व, चित्रकला,निबंध लेखन स्पर्धाही आयोजित केल्या होत्या.यातील विजेत्या विद्यार्थ्यांना क प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.विद्यार्थ्यानी कलादालन मध्ये व रांगोळी प्रदर्शनातुन विविध कलाविष्कार सादर केले होते.यावेळी राजश्री शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने शुभ्रा झरेकर,प्रियांका शेळके,पुनम पाटील या शिक्षिकांचा देखील संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तर दुपारच्या सत्रात सत्रामध्ये प्रा. शामराव माने.जयसिंग बच्चे व भगवानराव पवार यांनी आपल्या भाषणातून स्व.कांचन माई यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ए.बी. पाटील,सचिव अमोलकुमार पाटील,सचिवा राजलक्ष्मी पाटील,संचालिका आकांक्षा पाटील,अर्चना क्षीरसागर तसेच संस्थेतील विविध विभागांचे प्राचार्य,विभाग प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत के एस पोवार प्रास्ताविक पी एस चव्हाण,सूत्रसंचालन सौ.खामकर व आभार आर एस खर्जे यानी मानले.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements