Home Breaking News ध्वजारोहण न करणाऱ्या तलाठी राहत शेख यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा –...

ध्वजारोहण न करणाऱ्या तलाठी राहत शेख यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – महेश पाटील

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

ध्वजारोहण न करणाऱ्या तलाठी राहत शेख यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – महेश पाटील

 

 

हातकणंगले,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-संपूर्ण देशात हर घर तिरंगा उपक्रम राबवला जात असताना आज हातकलंगले तालुक्यातील मौजे चंदूर येथे तलाठी कार्यालयात 13 ऑगस्ट व 14 ऑगस्ट या दोन दिवसात एकदाही ध्वजारोहण करण्यात आले नाही. याबाबत चंदुरच्या तलाठी राहत शेख यांना चंदुरचे सरपंच स्नेहल कांबळे यांनी जाब विचारला असता तलाठी राहत शेख यांनी उद्धट उत्तर देत आम्हाला ध्वजारोहण संबंधी कोणतीही शासकीय परिपत्रक मिळाले नसल्याचे सांगितले. व दिशाभूल केले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली गावातील जेष्ठ नागरिक व गावकरी सर्वजण गाव चावडी येथे जमा झाले व याबाबत महसूल चे वरिष्ठ अधिकारी यांना सदर घटनेची माहिती दिली. हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील यांनी सर्व गावकऱ्यांच्या वतीने तलाठी राहत शेख यांचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी केलेली आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements