विजयसिंह यादव महाविद्यालयात भूगोलशास्त्र विषयाची कार्यशाळा संपन्न

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    विजयसिंह यादव महाविद्यालयात भूगोलशास्त्र विषयाची कार्यशाळा संपन्न

     

     

     

    पेठ वडगाव : येथील श्री विजयसिंह यादव महाविद्यालयात भूगोलशास्त्र विभाग व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने बीए भाग एक साठी भूगोल विषयाच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेच्या अधिष्ठाता प्रो.डॉ. एस. एच . ठकार मॅडम उपस्थित होत्या. तसेच भूगोलशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व शिवाजी विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे सदस्य प्रो. डॉ. बी. एस. जाधव उपस्थित होते. तर उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक चव्हाण यांनी भूषवले. प्रो. डॉ. ठकार मॅडम यांनी सांगितले की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन सक्षम बनवणारे आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची महाविद्यालयीन स्तरावर प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व त्यातून कौशल्य आधारित युवक तयार होण्यासाठी राबवावयाच्या उपक्रमाविषयी त्यांनी उपस्थित प्राध्यापकांशी संवाद साधला. डॉ. बी. एस. जाधव यांनी नवीन राष्ट्रीय धोरणाचा आढावा घेऊन भूगोलशास्त्र विषयातील संधी व आव्हाने स्पष्ट केली. अध्यक्षीय मनोगतात डॉ. अशोक चव्हाण यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास गती देणारे असून त्यांना स्पर्धात्मक जगामध्ये सक्षम बनवणारे असल्याचे सांगितले. . कार्यशाळेच्या विविध सत्रामध्ये विलिंग्डन महाविद्यालय सांगलीचे प्रा. डॉ. आर. जी. जाधव, क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय वाळवा चे प्रा.डॉ. के. आर. जाधव, प्रो. संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर चे प्रा. डॉ. प्रसन्न कुमार पाटील, दूध साखर महाविद्यालय, बिद्री चे प्रा. डॉ. एन. एम. पाटील, के. आर. पी. कन्या महाविद्यालय, इस्लामपूर चे प्रा. डॉ. एस. ए. गायकवाड, किसनवीर महाविद्यालय वाई चे प्रा. वी. आर. वीर, राजाराम कॉलेज कोल्हापूरचे प्रो.डॉ. एस. आर. शिकलगार यांनी विविध विषयावरती मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या विविध सत्राच्या नियोजनासाठी डॉ. एम. डी कदम, प्रा. डॉ. ए. डी. गाडे, डॉ. एस. डी. कांबळे, प्रा. एस. व्ही. इंगळे, डॉ. एस. एन. साळुंखे, डॉ. डी. एन. खरात, प्रा. एन. व्ही. गायकवाड, डॉ. बी. एस. शिंदे, डॉ. एस. जी. चावरे, डॉ. ए. पी. जरग, प्रा. एम. आर.चव्हाण यांनी कामकाज केले. कार्यशाळेच्या समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून एस. के. पाटील महाविद्यालय कुरुंदवाड चे प्राचार्य डॉ. आर. एस. कदम उपस्थित होते. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रो. डॉ. एम. ए. पटेल तर सचिव म्हणून डॉ. डी. जे. भंडारे यांनी कामकाज पाहिले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रो. डॉ. वर्षा सहदेव व प्रो. डॉ. प्रशांत गायकवाड यांनी केले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा. अधिकराव निकम, डॉ. अशोक जाधव, डॉ. सुरेश पाटील, डॉ प्रशांत यादव, प्रा. सुनील पाटील, प्रा. रघुनाथ चव्हाण, डॉ. रमेश कारंडे, डॉ प्रभाकर निसर्गध यांनी सहकार्य केले. कार्यशाळेसाठी शिवाजी विद्यापीठातील विविध महाविद्यालयातून सुमारे 200 प्राध्यापक उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements