Home कोल्हापूर जिल्हा मौजे वडगाव येथील विद्या मंदिर शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मौजे वडगाव येथील विद्या मंदिर शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

मौजे वडगाव येथील विद्या मंदिर शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 

 

हेरले,(प्रतिनिधी):-विद्या मंदिर मौजे वडगाव शाळेत सुवर्णकन्या रोहिणी देवबा आणि पोलीस ओंकार नलवडे यांनी यशोगाथेचा प्रवास विद्यार्थ्यांना विषद केला.
मौजे वडगाव येथील विद्या मंदिर या शाळेत आनंददायी शनिवार निमित्त सुवर्णकन्या रोहिणी देवबा आणि नवनियुक्त पोलीस ओंकार नलवडे यांनी विद्यार्थ्यांसमोर आपण या यशापर्यंत कसे पोहचलो तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दोघांनीही दिलखुलासपणे उत्तरे दिली त्यामुळे हा आनंददायी शनिवार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब कोठावळे हे होते.
यावेळी हेरले केंद्राचे केंद्रप्रमुख आर.बी. पाटील यांच्या हस्ते थायलंड येथे झालेल्या आशियाई क्रीडा कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल रोहिणी देवबा हिचा आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला नवनियुक्त पोलीस ओंकार नलवडे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्यामुळे दोघांचीही यशोगाथा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली.
शाळेच्या वतीने अध्यापक फिरोज मुल्ला, मुख्याध्यापक बाळासाहेब कोठावळे, केंद्रप्रमुख आर.बी. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी रोहिणीचे वडील खानदेव देवबा आणि मामा बिरू शिरोळे यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास अध्यापक सुहास कदम आणि सिताराम मोरे यांची विशेष उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक अध्यापक देवदत्त कुंभार यांनी तर आभार सायली चव्हाण यांनी मानले. वैशाली कुंभार यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यापिका स्वाती देसाई, रिजवाना नदाफ, वैशाली कांबळे,शबाना जमादार, सविता कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements