निवृत्त प्रा.मुरलीधर डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यापीठाच्या वस्तीग्रहास साडेसहा लाखाची देणगी

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    निवृत्त प्रा.मुरलीधर डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यापीठाच्या वस्तीग्रहास साडेसहा लाखाची देणगी

     

     

     

    पेठवडगाव : शिवाजी विद्यापीठाच्या प्रास्ताविक लोकस्मृति विद्यार्थिनी वस्तीग्रहासाठी भौतिकशास्त्र अधिविभागाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. मुरलीधर डोंगरे यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त सहा लाख 50 हजार रुपयाचा निधी देण्यात आला.

    Advertisements

     

    डॉ.डोंगरे यांच्या वतीने त्यांच्या पत्नी व वनस्पतीशास्त्राच्या अधिविभागाच्या निवृत्त प्राध्यापक डॉ. मीना डोंगरे यांनी विद्यार्थ्याचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के आणि प्र.कुलगुरू डॉ.पी.एस पाटील यांच्याकडे देणगीचा धनादेश देण्यात आला.

     

    शिवाजी विद्यापीठ शंभर विद्यार्थीनींच्या निवास व्यवस्थेसाठी लोकसभागातून लोकस्मृति विद्यार्थिनी वस्तीग्रह प्रकल्प साकारत आहे.

     

    आपले कुटुंब , आप्तस्वकीय प्रिय व्यक्तिच्या स्मृती जतन कराव्यात आणि त्यांच्या नावे ठराविक निधी विद्यापीठाकडे द्यावा त्यातून त्या व्यक्तीच्या नावे खोल्यांची उभारणी करण्याची विद्यापीठाची संकल्पना आहे. याचे महत्त्व लक्षात घेऊन दातृत्वाचा ओघ विद्यापिठाकडे सुरू आहे.

     

    यावेळी डॉक्टर मीना डोंगरे यांच्यासोबत कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, उपकूल सचिव डॉ. वैभव ढेरे, डॉ.सचिन पवार, डॉ. प्रशांत चिकोडे,डॉ.विजय कोठावळे, डॉ. चिदानंद कनमाडी,डॉ.ऐश्वर्या पवार,डॉ.तुषार घाटगे आदी उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements