Home कोल्हापूर जिल्हा कुंभोज; रयत शिक्षण संस्थेसमोरिल रस्त्यासाठी ग्रामपंचायतीस नागरिकांचे निवेदन 

कुंभोज; रयत शिक्षण संस्थेसमोरिल रस्त्यासाठी ग्रामपंचायतीस नागरिकांचे निवेदन 

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

कुंभोज; रयत शिक्षण संस्थेसमोरिल रस्त्यासाठी ग्रामपंचायतीस नागरिकांचे निवेदन

 

 

हातकणंगले,प्रतिनिधी ( विनोद शिंगे):-शाळेचा “चिखलमय रस्ता” या विषयाला वाचा फोडत. आज रयत शैक्षणिक संकुलातील कर्मचारी व शिक्षक वर्ग तसेच परिसरातील ग्रामस्थांनी कुंभोज ग्रामपंचायत सरपंच सौ स्मिता चौगुले उपसरपंच अशोक आरगे व महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी यांना निवेदन दिले तसेच सदर रस्ता तात्पुरता लवकरात लवकर मुरूम भरून तयार करण्यात यावा व पावसानंतर सदर रस्यायासाठी शासकीय निधी लावून तो पूर्ण करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

Advertisements

यावेळी लोकप्रतिनिधी यांना या समस्येची साधी दखल घ्यावीशी वाटत नाही. यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते? रयत गुरुकूल पब्लिक स्कूल’ला पंधरा गावातून येणा-या ५०० विद्यार्थ्यांपैकी निम्मे विद्यार्थी कुंभोजचे असताना स्वतः ला लोकप्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या नेत्यांना काहीच कसे वाटत नाही? असा सवाल ग्रामपंचायत येथे उपस्थित असणाऱ्या माळी,सपकाळ,आरगे मळ्यातील नागरिक व रयत गुरुकूल पब्लिक स्कूलचे शिक्षकवृंद यांनी मांडला. सदर रस्त्याची मागणी लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास कुंभोज ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलनासाठी बसण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी अरे स्कूलचे प्राचार्य सागर माने, महेश माळी सुशांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब पाटील संभाजी मिसाळ रितेश हिंगलजे तसेच कर्मवीर फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements