Home Breaking News खा.धैर्यशील माने यांच्याकडून बच्चे सावर्डे गावातील पुरग्रस्त परिस्थितीची पाहणी

खा.धैर्यशील माने यांच्याकडून बच्चे सावर्डे गावातील पुरग्रस्त परिस्थितीची पाहणी

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

खासदार धैर्यशील माने यांच्याकडून बच्चे सावर्डे गावातील पुरग्रस्त परिस्थितीची पाहणी

 

 

 

बच्चे सावर्डे, प्रतिनिधी(सुनिल पाटील):- गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आणि वारणा धरणातील विसर्गामुळे वारणा नदीकाठच्या गावांना महापुराचा तडाखा बसला आहे.या पार्श्वभूमीवर नूतन खासदार धैर्यशील माने यांनी बच्चे सावर्डे गावाला भेट दिली. यावेळी संपुर्ण गावाची पाहणी करून बाधित ठिकाणांना भेट दिली व नुकसानीचा अंदाज घेतला. जीवित व वित्तहानी टाळणेसाठी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करून स्थलांतरित होण्याची विनंती केली. तसेच प्रशासनाने पूरग्रस्तांना सोयी सुविधा पुरविण्याच्या सुचना केल्या.यावेळी पुराच्या काळामध्ये बच्चे सावर्डे, आमतेवाडी, शिंदेवाडी, देवाळे, नावली,असा जाणारा रस्ता करण्यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली. तसेच सावर्डे थेरगाव दरम्यान कालव्यातील रस्त्याला गार्ड करणे, दिशादर्शक बोर्ड लावणे, पूल बांधणे, हि पण मागणी यावेळी करण्यात आली. खा.धैर्यशील माने यांचा सत्कार ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

Advertisements

सदर भेटीवेळी तहसीलदार माधवी शिंदे जाधव, बीडीओ सोनाली माडकर मॅडम, विस्तार अधिकारी राजेंद्र तळपे साहेब, सावर्डे गावचे सरपंच बाळासाहेब पाटील. उपसरपंच संजय पाटील, वारणा बँकेचे संचालक विनायक बांदल, ग्रामसेवक लता कणसे, तलाठी कपील म्हैशाळे.कृषी अधिकारी कैलास कदम, डॉ.संदीप जाधव, गोपाळ पाटील,सोहन दळवी सरकार,बाजीराव बच्चे, चंद्रकांत बच्चे, रघुनाथ बच्चे, डॉ.अनिल सावंत, दिप्ती कोळेकर,डॉ,स्वाती पाटील, ओमकार चौगुले,आबासो पाटील,एच.आर.पाटील, भारत यादव, संभाजी पाटील,पोलीस पाटील सागर यादव,आशा सेविका, ग्रामपंचायत सर्व सदस्य, कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements