मोठ्या टेंपोतून बिम वाहतूक करण्याचे सायझिंग असोसिएशनचे इनामला आश्वासन

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    मोठ्या टेंपोतून बिम वाहतूक करण्याचे सायझिंग असोसिएशनचे इनामला आश्वासन

     

     

     

     

    इचलकरंजी :  शहरांत काल लहान टेंपोतून बिमवाहतूक करताना झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.याबाबत धोकादायक पद्धतीने झालेल्या वाहतुकीबद्दल सर्वत्र तीव्र प्रतिसाद उमटले इचलकरंजी नागरिक मंचने अशा प्रकारची वाहतूक न करण्याबाबत टेंपोचालकाना सक्त सूचना द्यावी व मोठ्या गाड्यातूनच बिमवाहतूक करण्यात यावी याबाबत आज सायझिंग असोसिएशनचे संचालक पांडुरंग धोंडूपडे व सेक्रेटरी दिलीप ढोकळे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.असोसिएशनने येथून पुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये लहान टेंपोतून वाहतूक करण्यात येणार नाही.कालची घटना दुर्दैवी असून कोणताही व्यवसाय हा कुणाच्या जिवापेक्षा मोठा नाही आम्ही सदर वाहतूक थांबवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करू असे आश्वासन इचलकरंजी नागरिक मंचला दिले.

    Advertisements

    सदर निवेदन शहर वाहतूक शाखेचे प्रभारी प्रशांत निशाणदार यांनाही देण्यात आले त्यांनी आम्ही दंडात्मक कारवाई सुरू केली असून याबाबत कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे सांगितले.मालवाहतूक संघटनांची बैठक बोलावली असून त्यांना याबाबत सक्त सूचना देण्यात येणार आहेत तसेच अल्पवयीन चालक,मद्यपान करून बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या टेंपोचालकांबाबत कारवाईचे आश्वासनही दिले.

    शिष्टमंडळात इनामचे उमेश पाटील,उदयसिंह निंबाळकर, राजु कोन्नुर,शितल मगदुम,राम आडकी,महेंद्र जाधव,विद्यासागर चराटे,राजेश बांगड,सिद्धार्थ इंगवले,अभिजित पटवा उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements