Home कोल्हापूर जिल्हा भेंडवडे गावातील नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर 

भेंडवडे गावातील नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर 

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

भेंडवडे गावातील नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर

 

 

हातकणंगले,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-भेडंवडे गावातील नागरिक धास्तावले वीस टक्के लोकांनी पशुधनासह परपंचिक साहित्य केले स्थलांतरित. सतत पडत असलेल्या पावसामुळे पूर बाधित म्हणून नोंद असलेल्या भेंडवडे या वारणा नदि काठच्या गावात पुराचे पाणी आलेआहे .25 तारखेला सतत पडलेल्या पावसामुळे या गावातील नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन शासनाच्या कुठल्याही न सूचना येता आपले जनावरे सुरक्षित रहावे ह्या हेतूने कोची भेंडवडे या रस्त्यावर पाणी यायच्या आधी आपली जनावरे मिळेल त्या वाहनातून मिळेल त्या ठिकाणी आपल्या पाहुण्यांच्याकडे स्थलांतरित केली जात आहेत.तसेच जवळ जवळ 240कुटुबाचे स्थलांतर गावातील सरकारी शाळेत करण्यात आले आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाबरोबरच गावातील अनेक नागरिक मदतीसाठी सरसावले आहेत.

Advertisements

भेडवडे पुरग्रस्त परिस्थितील लोकांनी पहाटेपासूनच सावध पवित्रा घेऊन या गावातील लोकांनी आपली जनावरे स्थलांतरित करण्यास सुरुवात केली ज्यांना पाहुण्यांच्या कडे सोय होत नाही अशा लोकांनी सरकारी शाळेचा आसरा देऊन आधार दिला त्याचबरोबर आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण यादव यांनी स्थलांतरित नागरिकांना वाहनाची सोय व जनावरांच्या साठी निवारा व चाऱ्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. परिणामी अद्याप भेंडवडे येथे जनावरांच्या साठी छावणी सुरू केलेली नाही त्यामुळे येथील लोकांचे हाल होतआहे .ज्यांना जागा नाही अशा लोकांनी शाळेच्या परिसरात जनावरे बांधली आहेत. पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी ग्रामपंचायत व स्थानिक पदाधिकारी तसेच गावातील विविध तरुण मंडळ व संस्थांनी मदतीचा हात पुढे केल्याचे चित्र दिसत आहे. हातकणंगले प्रतिनिधी विनोद शिंगे कुंभोज

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements