इचलकरंजी पूरपरिस्थिती पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट
हातकणंगले,प्रतिनिधी ( विनोद शिंगे):-राधानगरी धरणातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस आणि पाण्याचा होणार विसर्ग यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत आहे त्यामुळे इचलकरंजी पूरपरिस्थिती पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाशआण्णा आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी इचलकरंजीतील पूरपरिस्थितीची पाहणी केली. तसेच पूरपरिस्थितीमुळे नदीकाठावरील अनेक कुटुंबांचे घोरपडे नाट्यगृह येथे स्थलांतर करण्यात आले आहे. याठिकाणी भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली, त्यांच्या राहण्याच्या व इतर उपाययोजनांबाबत तेथील नागरिकांशी संवाद साधून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
आमदार प्रकाश आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी जुना यशोदा पुलाच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या कमान पुलामुळे यंदा महापूराचा फटका नागरी वस्तींना बसण्यापासून मोलाची मदत झाली आहे. त्यामुळे पंचगंगा नदी मार्गावर वर्षभरात आणखीन तीन ठिकाणी अशा पध्दतीने कमान पूल उभारण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन द्यावा त्यामुळे भविष्यात महापूराचा फटका सतावणार नाही, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडे केली.
यावेळी खासदार धैर्यशील माने, ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, नवमा संचालक बाळासाहेब माने, राहुल घाट, माजी नगरसेवक नागेश पाटील, विठ्ठल चोपडे, रविंद्र माने, सागर कम्मे, प्रमोद बचाटे, विजय माळी, प्रकाश पाटील, भाऊसो आवळे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह महानगरपालिका अधिकारी, आपत्कालीन विभाग कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.