Home कोल्हापूर जिल्हा रोटरी सेंन्ट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात ,अध्यक्षपदी अँड. विश्वासराव चुडमुंगे

रोटरी सेंन्ट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात ,अध्यक्षपदी अँड. विश्वासराव चुडमुंगे

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

रोटरी सेंन्ट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात ,अध्यक्षपदी अँड. विश्वासराव चुडमुंगे

 

 

 

हातकणंगले/प्रतिनिधी (विनोद शिंगे):-रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल पुरस्कृत रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबचा पदग्रहण सोहळा प्रोबस क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. सन 2024-25 साठी अध्यक्षपदी अॅड. विश्वासराव चुडमुंगे, उपाध्यक्ष पदी सुर्यकांत बिडकर, सेक्रेटरीपदी रामचंद्र निमणकर, सहसेक्रेटरीपदी सौ. प्रमोदिनी देशमाने व ट्रेझरर पदी सौ.विणा श्रेष्ठी यांची निवड करण्यात आली आहे.

Advertisements

सुरुवातीस माजी अध्यक्ष शिवबसु खोत यांना गजानन शिरगुरे यांनी कॉलर प्रदान केले. यानंतर राष्ट्रगीत होऊन विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. माजी उपाध्यक्ष सुनिल कोष्टी यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे सत्यनारायण रांदड यांचा परिचय जुगलकिशोर तिवारी, नागनाथ बसुदे यांचा परिचय काशिनाथ जगदाळे व सौ. चंदा कोठारी यांची ओळख सौ. सुजाता कोईक यांनी करून दिली. पाहुण्यांचा सत्कार प्रोबस मेंबर मोहन भिडे, एम. के. कांबळे, सौ. जयश्री दत्तवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. मागील कार्यकारीणीचा व कामाचा अहवाल सेक्रेटरी विजय पवार यांनी सादर केला. माजी अध्यक्ष शिवबसु खोत यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नेमलेल्या प्रोजेक्ट कमिटी चेअरमन सुनिल कोष्टी व सदस्य प्रदिप लडगे, प‌द्माकर तेलसिंगे, महिला विभाग सदस्या संगिता लडगे, वैशाली पाटील, सहल विभाग प्रमुख दिलीप शेट्टी, महावीर कुरुंदवाडे, फेलोशीप कमिटी प्रमुख दिपक दत्तवाडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. नुतन अध्यक्षकांचा परिचय विलास पाडळे यांनी केला.

नूतन पदाधिकार्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. नुतन अध्यक्ष विश्वासराव चुडमुंगे यांनी नवीन कार्यकारणी जाहीर केली. त्यामध्ये वैभव डोंगरे, अरुण केटकाळे, किरण कटके, प्रदिप लडगे, जुगलकिशोर तिवारी, गोविंद टिळंगे, सौ. शारदा कवठे, श्रीमती जयश्री चौगुले, गजानन खेतमर यांचा समावेश आहे.

याप्रंसगी संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी, प्रोबस क्लबच्या स्थापनेचा उ‌द्देश स्पष्ट करत भाविकाळातील योजनांची माहिती दिली. प्रमुख पाहुणे नागनाथ बसुदे, सत्यनारायण रांदड, सौ. चंदा कोठारी याप्रमुख पाहुण्यांनी प्रोबसच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. आभार नुतन सेक्रेटरी रामचंद्र निमणकर यांनी मानले. सूत्रसंचालन अमोल परीट व सौ. शारदा कवठे यांनी केले.

कार्यक्रमास अॅड. शिवराज चुडमुंगे, अॅड. तांबे, युवाउ‌द्योजक शैलेश सातपुते, गजाननराव सुलतानपुरे, सौ. अरुंधती सातपुते, सौ. जयश्री दत्तवाडे, दिलीप शेट्टी, सौ. रेखा कांबळे, लक्ष्मण घंटा, डॉ. सांगावे, डॉ. प्रकाश पाटील इ. मान्यवर हजर होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements