Home कोल्हापूर जिल्हा राज्यशासन पुरस्कृत जातीय दंगली घडविणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध

राज्यशासन पुरस्कृत जातीय दंगली घडविणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

राज्यशासन पुरस्कृत जातीय दंगली घडविणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध

 

 

हातकणंगले, प्रतिनिधी ( विनोद शिंगे):-महाराष्ट्राचे आराध्य दैवत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले श्रीविशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात किल्ले श्रीविशाळगडावर झालेली दंगल ही पूर्वनियोजित आणि राज्यशासन पुरस्कृत असल्याचा दाट संशय महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. किल्ले श्रीविशाळगडावरील अतिक्रमण हे हटवलेच पाहिजे आणि या अतिक्रमणविरोधी याआधीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विविध आंदोलने करण्यात आली होती आणि त्या आशयाचे निवेदन देखील प्रशासनाला देण्यात आले होते.
पण भविष्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशिष्ट अशा जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करून जातीय दंगली घडवून केवळ आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठीच राज्यशासन आणि पोलीस प्रशासन यांनी किल्ले श्रीविशाळगडावरील दंगल होऊ दिली त्यामुळे या दंगलीस कारणीभूत असणारे त्याविभागाचे पोलीस निरीक्षक आणि डीवायएसपी यांना तात्काळ निलंबित करावं आणि झालेल्या प्रकरणाची निवृत्ती न्यायाधीशामार्फत चौकशी करून या घटनेस कारणीभूत असणाऱ्या राज्यशासन आणि निष्क्रिय गृहमंत्र्यावर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन आज कोल्हापूर विभाग आय.जी. यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपनेते श्री संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच मा. आम. डॉ. सुजित मिणचेकर, मा. आम. उल्हासदादा पाटील, राज्यसंघटक चंगेजखान पठाण, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजय चौगुले, जिल्हाप्रमुख वैभव उगळे, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले.
या आंदोलनास कोल्हापूर शहरप्रमुख रवीकिरण इंगवले, वाहतूकसेना जिल्हाप्रमुख हर्षल पाटील, शहरसंघटक हर्षल सुर्वे, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटिका श्रीमती स्मिता सावंत, शहरसंघटिका सौ. प्रतिज्ञा उतुरे, उदय शिंदे, विजय भोसले बाबासाहेब पाटील, दत्तात्रय पवार, महेश चव्हाण , संदीप दबडे तसेच इतर शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements