Home कोल्हापूर जिल्हा डी वाय पाटील कृषि आणि तंत्र विद्यापीठाचे 178 विद्यार्थी प्रशिक्षणासाठी रवाना

डी वाय पाटील कृषि आणि तंत्र विद्यापीठाचे 178 विद्यार्थी प्रशिक्षणासाठी रवाना

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

डी वाय पाटील कृषि आणि तंत्र विद्यापीठाचे
178 विद्यार्थी प्रशिक्षणासाठी रवाना

 

 

नवे पारगाव :- डी.वाय. पाटील कृषि आणि तंत्र विद्यापीठ,तळसंदेचे बी टेक- कृषी अभियांत्रिकी विभागाचे १७८ विद्यार्थी १ महिन्याच्या प्रशिक्षणासाठी 29 विविध सरकारी संशोधन व प्रशिक्षण संस्था तसेच खाजगी उद्योगांमध्ये विद्यार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी रवाना झाले.

Advertisements

द्वितीय आणि तृतीय वर्ष बी.टेक कृषी अभियांत्रिकी चे एकूण 168 विद्यार्थी आणि प्रथम वर्ष एम. टेक कृषी अभियांत्रिकीच्या 10 विद्यार्थ्याना या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. भारतीय मृदा आणि जल संवर्धन संस्था संशोधन केंद्र कोटा(राजस्थान) आणि वासद (गुजरात), कृषी मंत्रालया अंतर्गत कार्यरत असणाऱ्या फार्म मशिनरी प्रशिक्षण आणि चाचणी संस्था (बुधनी (मध्य प्रदेश), विश्वनाथ चारियाली, जि. सोनितपूर, आसाम; हिसार, हरियाणा; अनंतपूर, आंध्र प्रदेश;), ‘गोकुळ’ (कोल्हापूर), ‘वारणा’(कोल्हापूर), मॅप्रो फूड प्रॉडक्ट्स (वाई); रेसवेरा वाईनरी (निफाड); अल्बेडो फाउंडेशन (नाशिक), बारामती ऍग्रो लिमिटेड (बारामती); किर्लोस्कर ऍग्रो इक्विपमेंट्स, कुडाळ, (सिंधुदुर्ग); फ्रॅटेली फ्रुट्स फार्मर प्रोड्युसर कंपनी, पिंपळगाव (नाशिक) आदी ठिकाणी हे विद्यार्थी प्रशिक्षण घेणार आहेत.

सदर एक महिन्याचे व्यावसायिक प्रशिक्षण हे कृषी अभियांत्रिकी या कार्यक्रमाचा अनोखा भाग आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना नामांकित तज्ञ शास्त्रज्ञ तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या सोबत काम करण्याची संधी उपलब्ध होते. त्यामुळे विद्यार्थ्याना नवे ज्ञान मिळून त्यांच्या व्यक्तिमत्व विकास होतो अशी माहिती कृषी अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जयंत घाटगे यांनी दिली.

या विद्यार्थ्यांना कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. के. प्रथापन, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत, कृषि अभियांत्रिकीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जयंत घाटगे यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी, प्रशिक्षण समन्वयक डॉ. प्रदिप दळवी, सहाय्यक प्राध्यापक डॉ. मंगल पाटील, डॉ. सोनम मेहेत्रे, डॉ. सारिका वांद्रे, डॉ. विनायक शिंदे, डॉ. अमोल गोरे, डॉ. सागर चव्हाण, श्री. दिपक शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements