दुग्ध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती: डॉ. पाटील

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    दुग्ध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती: डॉ. पाटील
    -डॉ.डी.वाय. पाटील कृषी महाविद्यालयच्यावतीने गोकुळ शिरगाव येथे चर्चासत्र

     

     

    कोल्हापूर : दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा व्यवसाय आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे मागणीच्या तुलनेत दुधाचा पुरवठा कामी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादनाची गरज भासणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी दूध उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच गोठ्यामध्ये जातिवंत जनावरांचे संगोपन करावे असे प्रतिपादन ‘गोकुळ’चे प्रशिक्षण अधिकारी डॉ एम.पी पाटील यांनी केले.

    Advertisements

    डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय तळसंदेच्यावतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गोकुळ शिरगाव(ता. करवीर) आयोजित चर्चासत्रात पाटील बोलत होते. दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन या विषयावर त्यानी शेतकऱ्याना मार्गदर्शन केले. मुंबई व पुणे यासारख्या शहरांमध्ये दुधाला मोठी मागणी आहे. जर आपण नियोजनबद्ध दुग्ध व्यवसाय केला तर या मध्यमातून शहरी भागातील पैसा ग्रामीण भागामध्ये वळेल आणि ग्रामीण अर्थकारणाला आणखी गती येईल आस विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.

    अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. एन. शेलार होते. यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील चुयेकर, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, नंदकुमार डेंगे, गोकुळ शिरगावचे लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत डावरे, साताप्पा कांबळे, संपतराव दळवी, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.

    महाविद्यालयाचे शिक्षण प्रभारी प्रा आर. आर. पाटील, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ एस. एम. घोलपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. वाय. व्ही. पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कृषीदूतांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

    गोकुळ शिरगाव- चर्चासत्रात शेतकऱ्याना मार्गदर्शन करताना डॉ. एम. पी. पाटील, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements