कुंभोज परिसरात पेटतय ऊस नोंदीच राजकारण, निवडणुकीतील विरोधकांच्या नोंदी घेण्याकडे कारखाना व्यवस्थापनाची टाळाटाळ

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    कुंभोज परिसरात पेटतय ऊस नोंदीच राजकारण, निवडणुकीतील विरोधकांच्या नोंदी घेण्याकडे कारखाना व्यवस्थापनाची टाळाटाळ

     

     

     

    कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):- कुंभोज तालुका हातकणंगले हे गाव ऊसाचे मोठे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. परिणामी परिसरातील अनेक सहकारी साखर कारखान्यांचे संचालक या परिसरात असून या गावाच्या शेतीपट्ट्यातून साधारणतः दहा बाजार पेक्षा जास्त सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना ऊसाची वाहतूक केली जाते. जिथे सहकार आले तिथे राजकारण आले जिथे राजकारण आले तिथे निवडणुकहि आलीच. मग वरच्या लेव्हलच्या नेत्यांचा ग्रामीण भागातील सभासद व शेतकरी व कशासाठी काढायचा असा प्रश्न सध्या कुंभोज परिसरातील शेतकरी वर्गाला पडला असून ऊस नोंदीचे राजकारण मात्र सध्या चर्चेचा विषय बनत आहे.

    Advertisements

     

    कुंभोज परिसरात सध्या ऊस नोंदीसाठी गटातटाचे राजकारण केले जात असून सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जी माणसे विरोधकांच्या बाजूने होती किंवा जे सभासदाने आपल्याला मतदान केले नाही किंवा विरुद्धकांचा प्रचार केला अशा सर्व सभासदांचा ऊस नोंदी घेताना अनेक आडफाटे आणले जात असून यामध्ये सहकारी साखर कारखान्याची संचालक भाग घेत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी सहकारी तत्त्वावर चालणारी साखर कारखाने सध्या काही राजकीय मंडळी व संचालक वर्गाचे मालकिचे बनत असून, यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. परिणामी साखर कारखान्याच्या राजकारणात चहापेक्षा किटल्या गरम अशी अवस्था निर्माण झाली आहे.

     

    परिणामी ऊसाच्या नोंदी घेत असताना सदर सभासद हा निवडणुकीमध्ये आपल्या बाजूला होता का ?असल्यास नोंद घ्यायची व नसल्यास त्याची नोंद घेताना टाळाटाळ करायची ,असा प्रकार सध्या कुंभोज परिसरात सर्व सहकारी साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये राबवला जात असून, सदर गोष्टीची विचारणा केली असता सदर कारखान्याच्या संचालक व अधिकारी वर्गाने विरोधक सभासदांचा ऊसाची नोंद घेऊ नका अशी माहिती दिली असल्याचे बोलले जात आहे. परिणामी. काल एकमेकांच्या विरोधात असणारे आज एकमेकांच्या गळ्यात गळे घालून राजकारण करत आहेत. खुर्चीच्या राजकारणासाठी सर्वजण एकत्र येत असताना सर्व सामान्य शेतकरी मात्र काही वेळा स्वतःच्या लोकशाहीने दिलेल्या अधिकाऱाने विरोधात गेला तर त्याला मात्र जाणीव पूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वतःच्या स्वार्थाच्या राजकारणात हातकणगले तालुक्यात राजकारणात कालचे विरोधक एकत्र येऊ शकतात परंतु सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या राजकारणात सभासद व मतदारांना विरोधकाला विरोधकच मानली जाते ही प्रथा कुठेतरी बंद होणे गरजेचे असल्याचे मत सध्या बोलले जात असून.

     

    सर्व सामान्य प्रशासन व संचालक वर्ग हा लोकांनी दिलेल्या मतावरती निवडून आलेला असतो, परिणामी राजकारणात विरोधक हे असतातच म्हणून त्याचा राग त्यांच्या शेतीत उत्पन्नावर काढणे कितपत योग्य आहे, अशा पद्धतीचा राग शेती उत्पन्नावर काढत गेल्यास सहकारी साखर कारखान्याला ऊस आणायचं तरी कुठून असा प्रश्न सध्या निर्माण झाला असून सध्या कुंभोज परिसरात ऊस नोंदीच्या राजकारणाचे चर्चा सर्वत्र रंगत आहे. परिणामी सदर गोष्टीची नोंद कारखान्याचे नेते, चेअरमन व शेती अधिकारी यांनी घेणे गरजेचे असून हे वातावरण अशाच पद्धतीचे राहिल्यास ग्रामीण भागातून कारखान्यांना मिळणाऱ्या ऊसात मोठ्या प्रमाणात घट होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements