संजीव चिकुर्डेकर यांचा आमदार भाई जगताप यांच्या हस्ते सत्कार
कोल्हापूर,(प्रतिनिधी) :- नुकतीच टिळक भवन,दादर (मुंबई) येथे महारष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस ST Employees Congress संघटनेचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर व विस्तारित कार्यकारिणीची बैठक पार पडली त्यामध्ये कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल संजीव चिकुर्डेकर यांना छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त दिला जाणारा या वर्षीचा छत्रपती शाहूराजे समता पुरस्कार प्राप्त झालेले संघटनेचे अधक्ष आमदार भाई जगताप MLA Bhai Jagtap साहेब हस्ते संजीव चिकुर्डेकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरचिटनिस श्रीरंग बरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार भाई जगताप म्हणाले की संजीव चिकुर्डेकर यांनी कामगार क्षेत्रात गेली 25 वर्षाहून अधिक काळ काम केले असून कामगारांच्या न्यायासाठी अनेकदा प्रशासनाविरोधात मोर्चे,निदर्षणे तसेच आमरण उपोषण आंदोलने यशस्वी करून न्याय मिळवला,त्यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांची कामगिरी व त्यांना छत्रपती शाहू महाराज यांच्या या सत्कारानंतर मिळालेला पुरस्कार याबाबी कामगारांना प्रेरणा देणाऱ्या असतील असे गौरव उद्गार काढले.
सत्कारानंतर पुरस्कार मिळणे व संघटनेकडून सन्मान होणे ही माझेसाठी आनंददायी बाब असून यामुळे पुढे काम करताना प्रेरणा मिळत राहील अशी प्रतिक्रिया संजीव चिकुर्डेकर यांनी व्यक्त केली.
प्रशिक्षण शिबिर व बैठकीस राज्यभरातून 500 हून अधिक कर्मचारी उपस्थित होते.