इ.ना.म. वतीने आयुष गार्डन साठी 50 वनौषधी झाडे प्रदान.
इचलकरंजी : येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात IGM लोकसहभागातुन ‘आयुष गार्डन’ साकारण्यात येत आहे.इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने 50 वनौषधी झाडे आज इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नंदकुमार बणगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यामध्ये पारिजातक, बकुळ, चाफा,बदाम,सीता अशोक, बेहडा ,अर्जुन, कडुनिंब, करंज, कैलासपती,तामन आदि प्रजातीच्या झाडांचा समावेश आहे. लोकसहभागातून साकारत असलेल्या या उपक्रमासाठी इचलकरंजी नागरिक मंचने केलेल्या मदतीसाठी प्रशासनाच्या वतीने डॉ.बनगे यांनी इनामचे आभार मानले. आम्ही दवाखान्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा करत असून रुग्णसेवेबद्दल दक्ष असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे उमेश पाटील,अमित बियाणी,राजु कोन्नुर,राम आडकी,जतीन पोतदार,अमोल मोरे,उदयसिंह निंबाळकर,राजुदादा आरगे,दयानंद लिपारे,डॉ सुप्रिया माने,कल्पना माळी,अराध्या पोतदार,महेंद्र जाधव,दीपक पंडित, हरीश देवाडिगा,योगेश पाटुकले,करण शिरोळे,अभिजित पटवा,उपस्थित होते.