Home गुन्हेगारी चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात दगड घालून जखमी केलेल्या पत्नीचा मृत्यू 

चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात दगड घालून जखमी केलेल्या पत्नीचा मृत्यू 

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात दगड घालून जखमी केलेल्या पत्नीचा मृत्यू

 

 

पेठ वडगाव : पत्नीचे अन्य व्यक्ती समवेत अनैतिक संबंध असावेत अशा गैरसमजातून पत्नीच्या डोक्यात मसाला वाटण्याचा दगड घालून जखमी केलेल्या पत्नी आयेशा (वय 26) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी वडगाव पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी वाठार तर्फ वडगाव (ता.हातकणंगले) येथील सलमान उमर पटेल  याचा डिसेंबर 2019 मध्ये तासगाव (जिल्हा सांगली) येथील अबू गुलाब मुल्ला यांची मुलगी आयेशा हिच्या सोबत विवाह झाला होता. सलमान शिरोली एमआयडीसीत एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता.

विवाह झाल्यापासून सलमान हा आपल्या पत्नीवर संशय घेऊन सतत मारहाण करत होता. त्याच्या पत्नीचे अन्य व्यक्ती समवेत अनैतिक संबंधात असा त्याचा संशय होता. यातूनच पती-पत्नीचे अनेकदा वाद होत होते.

शनिवार 22 रोजी रात्री पुन्हा वाद झाला होता. सलमानच्या आई जहारा यानी दोघांमधील वाद मिटवून जेवन करून सर्व झोपले होते. मध्य रात्री 12.30 च्या सुमारास  रागाच्या भरात त्याने पत्नीच्या डोक्यात मसाला वाटण्याचा दगड घालून घराबाहेर निघून गेला.

सलमानच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी धावत आले आणि डोक्यातून रक्तस्राव होऊन बेशुद्ध झालेल्या आयेशाला कोल्हापुर येथील सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले होते.उपचार सुरू असताना बुधवारी दि.26 रोजी आयेशाचा मृत्यू झाला.

मुलगीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची फिर्याद सलमानचे सासरे अबु मुल्ला यांनी वडगाव पोलिसांत दिली आहे.

अधिक तपास पोलीस निरीक्षक विलास भोसले उपनिरीक्षक गिरीश शिंदे करत आहेत.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements