Home गुन्हेगारी गावकरी लग्नात चोर घरात, रोख रकमेसह दागिने केले लंपास

गावकरी लग्नात चोर घरात, रोख रकमेसह दागिने केले लंपास

गावकरी लग्नात चोर घरात, रोख रकमेसह दिगिने केले लंपास निलेवाडी येथील बोरगे मळ्यातील घटना

 

 

नवे पारगाव, (प्रतिनिधी) :- निलेवाडी तालुका हातकलंगले येथे बोरगेमळा परिसरात दिवसा ढवळ्या घरफोडी झाली.                                    घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार निलेवाडी येथे मानसिंग भोसले यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे बरेच लोक लग्नाला गेले होते त्यामध्ये बोरगेमळ्यातील सुद्धा बहुतांश लोक होते याच संधीचा फायदा घेऊन दुपारी एक ते दीडच्या दरम्यान चोरट्यानी श्री बाबासो बोरगे व शिवाजी शिंदे यांच्या घरी घराचे कुलूप तोडून धाडसी चोरी केली. तसा बोरगेमळा हा परिसर नेहमी लोकांच्या वर्दळीचा व वारणानगर ऐतवडे खुर्द रोडवरील असून भरपूर लोकांची ये जा या मार्गावरून असते . आशा रहदारीच्या परिसरात चोरट्याने चोरी केल्याने नागरिकांच्या भीतीचे वातावरण आहे . यामध्ये चोरट्यानी श्री बाबासो बोरगे यांच्या घरातील रोख 47 हजार सहाशे रुपये तसेच सोन्याचे दागिने यामध्ये नेकलेस ,अंगठी ,रिंगा व कानातील टॉप्स असे साधारणतः तीन तोळ्याचा दागिन्यांचा समावेश आहे तर शिवाजी शिंदे यांच्या घरातील जवळपास चार ते पाच हजार रोख रक्कम यामध्ये चोरट्यानी कुलूप तोडून नेली शिवाजी शिंदे यांच्या घरातील तिजोरीचा लॉकर तोडता न आल्यामुळे घरात असलेले दागिने वाचले .चोरी झाल्याची वर्दी वडगाव पोलीस स्टेशनला मिळतात श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले परंतु श्वान पथकातील कुत्र्याने घराशेजारील ज्ञानदेव बोरगे यांच्या घराच्या पुढील बाजूस पश्चिमेला घरापासून 50 मीटर एवढ्या अंतरावर जाऊन घुटमळेले व माग काढता आला नाही. ठसे तज्ञांनी घरातील सर्व वस्तूंची पाहणी केली व ठसे घेतले.

यावेळी वडगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय गिरीश शिंदे, लक्ष्मण सलगर, अंमलदार प्रमोद चव्हाण, सुतार व माने , वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.