Home गुन्हेगारी कुंभोज परिसरात चोरट्यांचा वावर..

कुंभोज परिसरात चोरट्यांचा वावर..

कुंभोज परिसरात चोरट्यांचा वावर..

कुंभोज,(प्रतिनिधी) :- तालुका हातकलंगले येथे चौगुलेवाडी शिवाजीनगर शाहू नगर परिसरात सध्या भूरट्या चोरांचा वावर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, सदर चोर हे जनावरे व अन्य साहित्य चोरून नेण्याच्या प्रयत्नात असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे. परिणामी काही नागरिकांची चाहूल मिळता सदर चोरटयांनी ऊस क्षेत्रातुन पळ काढला. असल्याची माहिती परिसरातील मिळाली असून सदर ,चोरट्यांच्या पायाचे ठसे ही रानामध्ये उमटले आहेत. परिणामी सदर चोरट्यां च्यापासून कुंभोज ग्रामस्थांनी सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

विनोद शिंगे,कुंभोज.