चिकुर्डे मंडळाच्या वतीने जातीचा दाखले वाटप व अर्ज स्वीकृती शिबिर संपन्न
चिकुर्डे,(प्रतिनिधी):- चिकूर्डे तालुका वाळवा येथे शासनाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत विविध दाखले वाटप संकलन शिबिर मंडल अधिकारी गोपीचंद वडर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले . मा प्रांताधिकारी अर्जुन श्रीवास्तव व मा तहसीलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी चिकुर्डे परिसरातील सर्व गावचे तलाठी यांनी परिश्रम घेतले
यावेळी बोलताना मंडलाधिकारी गोपीचंद वडर यांनी सांगितले की नागरिकांनी शासनाच्या योजनाचा जास्तीत जास्त योजनांचा लाभ घ्यावा तसेच प्रवेशाच्या वेळी होणारी गडबड टाळण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी जातीचे दाखले व अत्यावश्यक कागदपत्र आत्ताच तयार करून घ्यावेत
यावेळी मंडल अधिकारी गोपीचंद वडर तलाठी सागर सूर्यवंशी , उत्कर्षा कांबळे बाळासाहेब पाटील विनायक पाटील प्रमोद पवार त्यावेळी सर्व महा ई सेवा केंद्र चालक हजर होते तसेच सर्व गावातील कोतवाल व मंडळातील सर्व गावातील ग्रामस्थ विद्यार्थी व लाभार्थी उपस्थित होते.