दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे अद्ययावत आय टी क्लासरुमचे उद्घाटन
सैतवडे : येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये आज आय.टी.क्लासरुमचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांच्या हस्ते फीत कापुन या वर्गखोलीचे उद्घाटन करण्यात आले. यासाठी मुसा अली पागरकर,अलीम बोंद्रे यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रहीम हसन माद्रे,तसेच पदाधिकारी सर्वश्री अजिज माद्रे,शफी महंमद चिकटे,इलियास माद्रे,हशमत निवेकर, उपसरपंच मुनाफ वागळे,समीर आढाव,हर्षद पेढे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कोळेकर म्हणाले, संगणक शिक्षणाची आवश्यकता लक्षात घेवून संस्थेने काही शिक्षणप्रेमी लोकांच्या सहभागातून ही अद्ययावत संगणक वर्गखोली तयार केली आहे. तसेच शाळेतील व शाळेबाहेरच्या विद्यार्थ्यांना ही MSCET आदी कोर्सेस सुरु केले जाणार आहेत. परिसरातील विद्यार्थ्यांना ही फार मोठी सोय उपलब्ध झाली आहे. दि मॉडेल च्या वाटचालीतील हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे.
या कार्यक्रमासाठी श्री रुमान पारेख, कु.सोनाली निवेंडकर, श्री अविनाश केदारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री विनोद पेढे यांनी केले. तर संपूर्ण नियोजन इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी केले.यावेळी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व संस्था पदाधिकारी उपस्थित होते.