पाराशर विकास संस्थेतर्फे २० लाख लाभांश : बाबासाहेब मोरे
नवे पारगाव: पारगाव (ता.हातकणंगले ) येथील पाराशर विकास संस्थेतर्फे सभासदांना दिवाळी निमित्ताने १५ टक्के प्रमाणे २० लाख लाभांश व दिवाळी भेटवस्तू दिली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मोरे यानी दिली.
संचालक मिलींद कुलकर्णी, सचिव संजय सिद, उपाध्यक्ष अनिल पाटील यांची भाषणे झाली. संचालक मनोहर डोइजड, संतोष कारंडे, शिवाजी पाटील, विलास पाटील, बाळासो चाळके, हरी लोळगे, सिंधुताई पाटील, सुनंदा चाळके, सरपंच तुकाराम पोवार, माजी उपसरपंच प्रकाश मोरे, रामचंद्र बोणे, भिमराव पाटील,रामचंद्र पाटील उपस्थित होते.