278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघातुन दुसऱ्या दिवशी सतरा अर्जाची विक्री
पेठ वडगाव(मोहन शिंदे) : 278 हातकणंगले अनुसूचित जाती राखीव विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज विक्रीच्या दुसऱ्या दिवशी एकुण 17 इच्छुक उमेदवारांनी 17 अर्ज खरेदी केले. तर आरपीआय गटाच्या वतीने गणेश वाईकर यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हातकणगले विधानसभा मतदारसंघातील अर्ज दाखल होणारे आरपीआयचे ते पहिले उमेदवार आहेत.संपूर्ण महाराष्ट्रात सर्वप्रथम त्यांची उमेदवारी जाहीर झाली व सर्वप्रथम त्यांनीच उमेदवारी अर्ज दाखल केला.
अर्ज खरेदी केलेल्यापैकी विनोद खिलारे (भाजप), अशोक कांबळे (शिवसेना शिंदेगट), प्रदीप कांबळे (अपक्ष), राहुल गायकवाड (अपक्ष),वैभव कांबळे (स्वाभिमानी पक्ष), संजय कांबळे (अपक्ष), अशोक माने (अपक्ष), सुहास राजमाने (जनसुराज्य पक्ष), बाबासाहेब घाटगे (अपक्ष), डॉ. सुजित मिणचेकर (उभाटा ठाकरे गट), पार्थ मिणचेकर (अपक्ष), डॉ. प्रगती चव्हाण (रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटना), विनायक कोठावळे (अपक्ष), अमर शिंदे (बहुजन स.पक्ष), तुकाराम कांबळे (अपक्ष), सतीश कुरणे (अपक्ष), सुरेश कांबरे (अपक्ष) इत्यादी लोकांनी अर्ज खरेदी केले आहे. अशी माहिती 278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी दिली.