Home पेठवडगांव वडगाव पालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण ; एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

वडगाव पालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण ; एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

वडगाव पालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण ; एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

 

 

पेठवडगाव : येथील वडगाव नगर पालिका यांच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा अभियान तसेच वडगाव पालिकेच्या 137 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महालक्ष्मी तलाव येथे वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

वडाच्या झाडाचे म्हणजेच वडाचे बन करण्याचा पालिकेने संकल्प केला असून यावर्षी सुमारे एक हजार वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाचा देखील संकल्प करण्यात आलेला आहे.

या अंतर्गत सुमारे आठशे वडाच्या वृक्षांचे वृक्षारोपण आतापर्यंत करण्यात आले तसेच वडगाव शहरात इतर ठिकाणी देखील वृक्षारोपण केले असून येणाऱ्या काळात सुद्धा जास्तीत जास्त वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन करण्यात येणार आहे.

या वृक्षारोपण मोहिमेसाठी वडगाव नगर पालिकचेप्रशासक तथा मुख्याधिकारी सुमित जाधव , पालिकेचे अधिकारी व पदाधिकारी, कर्मचारी वर्ग, सामाजिक संस्था, पत्रकार बंधू नागरिक उपस्थित होते.