Home पेठवडगांव भाजपा च्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

भाजपा च्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

भाजपा च्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

 

 

 

 

पेठ वडगांव, (प्रकाश कांबळे) :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल महाडमध्ये शालेय अभ्यास क्रमात मनुस्मृतितील श्लोक समाविष्ट करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ आंदोलन करीत असताना श्लोक असलेले व त्यावर छापल्यामुळे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पोस्टर फाडले या घटनेचे तीव्र प्रतिसाद महाराष्ट्र राज्यभर उमटले आहेत.

याचा निषेध म्हणून आज पेठवडगाव येथील नगरपालिका चौकामध्ये भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आम. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडो मारून आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे हातकणंगले तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विश्वास माने, वडगाव शहर अध्यक्ष जगन्नाथ माने, संजय गांधी निराधार समिती सदस्य दीपक ढाले, भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा सूर्यवंशी, हातकंणगले तालुका अल्पसंख्यांक महिला आघाडी अध्यक्ष बानु नदाफ, तालुका उपाध्यक्ष धनंजय गोंदकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पियुष शहा, वडगांव सरचिटणीस राजेंद्र जाधव, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अमर पाटील,संतोष ताईगंडे, प्रथमेश शिंदे, सौरभ बुढ्ढे,अजय मोरे, सलीम मुल्लानी, राजेंद्र बुरुड, ओंकार मिरजकर,हेमंत पाटील,पियुष सावर्डेकर, अमोल गोंजारे, राजन कांबळे, राहुल दबडे, नितीन मोरे, विकास कांबळे, सुनील लाड यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.