Home कृषी ठिबक सिंचन अनुदान 10 ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार-अजय कुलकर्णी

ठिबक सिंचन अनुदान 10 ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार-अजय कुलकर्णी

ठिबक सिंचन अनुदान 10 ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार-अजय कुलकर्णी

 

 

कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-महाराष्ट्र शासन कृषि विभाग डॉ.पंजाबराव देशमुख यांची 125 जयंती निमित्त कृषि संजीवनी पंधरावड़ा कार्यक्रम अंतर्गत कृषि महिला शेतकरी सन्मान दिन व शेतकरी चर्चाशास्त्र हनुमान मंदिर, कुंभोज येथे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ.स्मिता चौगुले प्रमुख उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे उद्घाटन अजय कुलकर्णी जिल्हा कृषि अधिकारी, कोल्हापुर ,बाबासाहेब चौगुले व्हा. चेअरमन, जवाहर कारखाना , अरुण पाटिल संचालक वारणा दूध संघ, प्रकाश पाटील ,भाग्यश्री जाधव, किरणं माळी,सरपंच मधुमती पाटील, मीनाक्षी कुंभोजे, शेती अधिकारी बाबासो घोडगे, क्रांती गुरव,नंदकुमार कोठावळे, ओमकार पाटील तसेच परिसरातील कृषीकन्या आदी मान्यवर उपस्थित होते.

आधुनिक बद्दलच्या जागा नुसार शेतीचे क्षेत्र बदलत आहे परिणामी कमी वेळेत ज्यादा उत्पन्न देणारे व कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी पिके करणे गरजेचे असून शेतकऱ्यांनी पूर्वीची परंपरा सोडून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना बी बियाणे व अन्य सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून त्याचा फायदा शेतकऱ्यांनी शेती विभागाच्या मार्फत करून घ्यावा असे आव्हान ,तसेच कृषी खात्यातील ठिबक सिंचन अनुदान 10 ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असे जिल्हा कृषी अधिकारी अजय कुलकर्णी यांनी सांगितले.

यावेळी प्राध्यापक शांतीकुमार पाटील यांनी बोलताना शेतीत आवश्यक असणारे बदल पावसाची अनिमित्त निसर्गात होणारे बदल यावर आधारित असणारी शेती करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करून शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा सुविधा महाराष्ट्र शासन शेती विभाग व आपल्या मार्फत पुरवल्या जातील त्यासाठी शेतकऱ्यांना संपर्क साधण्याचे आव्हाने या योजने केले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार कृषी विभागाच्या वतीने करण्यात आला.

जैमिनीचे स्वास्थ्य व विक्रमी ऊस उत्पादन तंत्रज्ञान यावर ओंकार पटेल व्याख्यान झाले.तसेच सेल्स एक्ज़िकेटिव, इंडीकेम स्पेशलिटी फ़र्टिलायडर यांनी भाजीपाला पिकातिल अन्नद्रव्ये व्यवस्थापन या विषयावर एन. ए. मिसाळ यांनी व्याख्यान झाले.

यावेळी आर.व्ही.परीट, बी. एम. गोडगे कृषि पर्यवेक्षक हातकणंगले,श्रीमती के. एम. गुरव कृषि सहाय्यक कुंभोज उपस्थित होते.