आमदार सतेज उर्फ बंटी पाटील फौंडेशनच्या वतीने दिव्यांग व्यक्तींच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

    आमदार सतेज उर्फ बंटी पाटील फौंडेशनच्या वतीने दिव्यांग व्यक्तींच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

     

     

    रेंदाळ,(प्रतिनिधी):-  गरजू व दिव्यांग मुलाना मदत नव्हे तर आमचे कर्तव्य म्हणून आम्ही सदैव तुमच्या पाठीशी असून दिव्यांग विद्यार्थ्यांना आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या मार्फ़त मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू असे प्रतिपादन युवक कॉग्रेस चे अध्यक्ष प्रणित मधाळे यांनी केले.

    ते रेंदाळ येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांच्या वतीने आमदार सतेज उर्फ बंटी पाटील फौंडेशन हुपरी यांच्या मार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना व दिव्यांग व्यक्तींच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेंदाळ गावाच्या लोकनियुक्त सरपंच सुप्रिया भरत पाटील होत्या.शिवसेना उपशहर प्रमुख अरुण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

    तसेच रेंदाळ ग्रामपंचायतीचे क्लार्क अनिल घोडेस्वार यांची शिरोळ पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी पदी, कुमार तांबे यांची शिरोळ पंचायत समितीच्या वरिष्ठ लेखा अधिकारी पदी व अपर्णा महाजन हिची संगणक विभाग नगर अभियंता पदी निवड झाल्याबद्दल मान्यवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    यावेळी प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल पाटील,प्रहार अपंग संघटनेचे इचलकरंजी शहर अध्यक्ष अनिल विजयनगरे, उद्योगपती सचिन काका सूर्यवंशी,पोलीस पाटील सचिन पुजारी, प्रहार अपंग संघटनेचे रेंदाळ शहर अध्यक्ष जमीर माणकापुरे, उपाध्यक्ष निलेश कुंभार, कार्याध्यक्ष संभाजी शेलार, खजिनदार संजय मांगलेकर, सचिव सागर वास्कर, महिला अध्यक्षा भारती नेजे, महिला उपाध्यक्षा दिलशाद मुजावर आदीसह प्रहार अपंग संघटनेचे सदस्य,अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.