Home सामाजिक सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढवळे यांचा हाळगाव ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार

सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढवळे यांचा हाळगाव ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार

सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढवळे यांचा हाळगाव*ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार

 

श्रीगोंदा : आजकाल मुला मुलींचे विवाह जमविण्यासाठी अनेक प्रकारचे अडचणींना सामोरे जावे लागत आहे या सर्व बाबींचा विचार करून हाळगाव ता.जामखेड येथील सद्या श्रीगोंदा येथील ढवळे वधू वर सूचक केंद्र चे अध्यक्ष सुभाष अर्जुन ढवळे यांनी सर्वधर्मीय मुला मुलींचे विवाह जमवावेत यासाठी स्वतः चेच दोनशे पेक्षा अधिक हॉटस अप ग्रुप तयार करून या कार्याला सुरुवात करून संपूर्ण महाराष्ट्रसह गुजरात मध्यप्रदेश कर्नाटक या राज्यांत ग्रुपच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष मुला मुलींच्या गावी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी खात्री करून सर्वधर्मीय मुला मुलींचे आजपर्यंत ६५० पेक्षा अधिक विवाह जमविले आहे.तेही खात्रीशीर आणि ऐक रुपया ही न घेता.या कार्याबद्दल ढवळे वधु वर सूचक श्रीगोंदा चे अध्यक्ष श्री सुभाष ढवळे यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सामाजिक संघटना मुला मुलींच्या नातेवाईक यांनी सुभाष अर्जुन ढवळे यांचा सत्कार समारंभ केलेले आहेे. या कार्याबद्दल हाळगाव ता.जामखेड येथे सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने सन्मान करतांना आजिनाथ साखर कारखाना चे माजी संचालक आणि हाळगाव विविध सहकारी पतसंस्था चे चेअरमन किसनराव ढवळे सरपंच सौ.अनिताताई ढवळे अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन आबासाहेब ढवळे  यांनी अध्यक्ष सुभाष ढवळे यांचा सत्कार केला यावेळी गावातील अनेक गावकरी मंडळी उपस्थित होते.