Home सामाजिक वडीलांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मस्के परिवाराने केले वृक्षाचे वाटप

वडीलांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मस्के परिवाराने केले वृक्षाचे वाटप

वडीलांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मस्के परिवाराने केले वृक्षाचे वाटप

 

 

वाठार,(प्रकाश कांबळे):-वाठार (ता.हातकणंगले) येथे कै कृष्णा भाऊ मस्के यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पारंपरिक पद्धतीला फाटा देत पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणून डॉ. अजय मस्के व ऍड विजय मस्के या बंधूनी आपल्या विस्डम फाउंडेशन च्या वतीने वडिलांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आपल्या सर्व पाहुणे व मित्रपरिवार यांना 1 हजार वृक्षांचे वाटप भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या हस्ते केले .

यावेळी के.डी.सी.सी.बँक संचालक विजयसिंह माने, फार्म एक्सल ऍग्रो चे प्रमुख मछिंद्र चौगुले, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलीत डॉ.बापूजी साळूंखे अभियंत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे सर, प्रा.विरेन भिर्डी सर, शामराव सालपे, भिकाजी मस्के, गंगाराम मस्के,पत्रकार प्रकाश कांबळे, श्री दत्त सोसायटी चे संचालक ,परशुराम मस्के, नानासो मस्के,विजय माने, महालक्ष्मी दुध संस्था चेअरमन आण्णा शिंदे, प्रतीक शिंगे,उपसरपंच गजेंद्र माळी, ग्रा.प.सदस्य, सुहास पाटील,महेश कुंभार, राहुल पोवार, महेश शिर्के, सागर कांबळे,प्रदीप मस्के,प्रा अंकुश कुरणे, राजेश हिरवे, प्रा अशोक कोळेकर,संदीप चौगुले,जावेद कुरणे,अभिजित सुतार, रफिक पटाईत, विश्वास मस्के, विलास मस्के, सर्जेराव गायकवाड,अरविंद पाटील,संकेत मस्के, अतुल पोवार,अजय धोतरे, अमित माळी,यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.