राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार
सांगली , (प्रतिनिधी):-खंडाळा येथील माध्यमिक विद्यालय भागशाळा व पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री राजेश जाधव यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.आनंदा पाटील म्हणाले , राजेश जाधव यांनी क्रीडा व सामाजिक क्षेत्रात गौरवास्पद काम केले आहे. वाटद खंडाळा सारख्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी,विद्यार्थीनींना क्रिकेट चे धडे दिले.पुढे त्यातील अनेक मुलींना शासकीय, निम शासकीय नोक-या प्राप्त झाल्या.त्याचे संपूर्ण श्रेय श्री जाधव सरांना जाते.शिस्तबद्ध व संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याच्या सरांच्या कामाचा हा सन्मान आहे. तसेच श्री दत्ता निमकर म्हणाले, जाधव सरांची काम करण्याची हातोटी आणि सेवेतील सचोटी कौतुकास्पद आहे.यावेळी श्री लक्ष्मण कातकर, श्री किंजळे सर,श्री अनिल पवार,श्री अनिकेत सुर्वे आदींची भाषणे झाली.
सत्काराला उत्तर देताना श्री जाधव सर म्हणाले, मला यापुढेही अधिक जोमाने व जबाबदारीने काम करण्याची उर्जा मिळाली आहे.माझे विद्यार्थी भविष्यातआंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतील अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी मंचावर माजी जि.प.सदस्य बाबुशेठ पाटील, माजी समाजकल्याण सभापती सौ.ऋतुजा जाधव,श्रीमती सुजाता जाधव ,ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री दत्ता निमकर उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक श्री विलासराव कोळेकर यांनी केले. यावेळी वाटद खंडाळा सरपंच अमित वाडकर, माजी सरपंच बापु घोसाळे,श्री अनिकेत सुर्वे, सैतवडेचे सरपंच साजिद शेकासन, वाटदचे शिवसेनेचे विभागप्रमुख बाबय कल्याणकर, ग्रामसेवक संदिप जाधव, श्री सुरेश सुर्वे,श्री तुकाराम वासावे,श्री विनायक नांदिवडेकर,श्री लक्ष्मण कातकर,श्री शरद जाधव,श्री सुवेश चव्हाण, श्री मारुती शितप, सौ.पायल जाधव,सौ.अंकिता जाधव, सौ.सानिका जाधव,सौ.साक्षी जाधव, सौ.शामल वासावे,सौ.दिव्या जाधव, प्रा.आनंदा पाटील, श्री प्रसाद पेढे,श्री नंदादीप जाधव,श्री अनिल फडकले, श्री अनिल पवार, मुख्याध्यापक प्रदिप वाघोदे,श्री सुनिल भोजे, रत्नागिरी तालुका संघाचे अध्यक्ष प्रकाश पवार,नंदकुमार डींगणकर, राजकुमार जाधव,संतोष पवार, किशोर पवार,रविकांत पवार,वैभव पवार,प्रमोद घाटगे, द.बा.जाधव, श्री नितीन सुर्वे,श्री अनिकेत पवार ,कारखानीस,यशवंत जाधव,सुभाष गमरे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.