Home राजकीय हातकणंगले विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारीसाठी धनाजी कराडे यांची प्रदेश काँग्रेसकडे मागणी ...

हातकणंगले विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारीसाठी धनाजी कराडे यांची प्रदेश काँग्रेसकडे मागणी           

हातकणंगले विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारीसाठी धनाजी कराडे यांची प्रदेश काँग्रेसकडे मागणी

पेठवडगाव, (प्रतिनिधी) :-  278 हातकणंगले (अनुसूचित जाती राखीव) विधानसभा मतदार संघासाठी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारीची मागणी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस (वक्ता विभाग) जिल्हाउपाध्यक्ष धनाजी कराडे यांनी व शिस्तमंडळाने निवेदनाद्वारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे टिळक भवन, मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन केली. तसेच शिष्टमंडळाने सध्या हातकणंगले मतदार संघातील परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. ही उमेदवारी मागण्याची पुढील महत्वाची कारणे निवेदनात विशद केली आहेत.

मतदार संघात बौद्ध समाजाची मते संख्येने अधिक व निर्णायक –

हातकणंगले विधानसभा मतदार संघामध्ये अन्य समाजांच्या मानाने आमच्या बौद्ध समाजाची मते संख्येने अधिक असून हे मतदान निर्णायक आहे. तसेच येथे बौद्ध समाजाची मोठी ताकद आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत या मतदारसंघात बौद्ध समाजाचे मतदान प्रभावी ठरते.

 

गेली 50वर्षे एकदाही बौद्ध समाजाला काँग्रेस कडून संधी नाही –

आमचा बौद्ध समाज काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदार आहे. हातकणंगले विधानसभा मतदार संघामध्ये आमच्या बौद्ध समाजाची मते संख्येने अधिक असूनही गेली 50 वर्षे या मतदारसंघांमध्ये आपल्या काँग्रेस पक्षाकडून स्थानिक बौद्ध समाजाला एकदाही अधिकृत उमेदवारी दिलेली नाही. बौद्ध समाजाबाबत हा अन्याय आहे.

 

आजपर्यंत एकाच घरातील व मतदारसंघा बाहेरील व्यक्तींना उमेदवारी –

सन 1980 पासून आजतागायत एकाच घरातील व्यक्तींना प्रत्येक वेळी उमेदवारी देण्यात आलेली आहे. तसेच सदरचे उमेदवार हातकणंगले मतदारसंघ बाहेरील आहेत. पण इतका मोठ्या कालावधीतही मतदारसंघाचा आपेक्षित विकास नाही. त्यामुळे सध्या जनतेत प्रचंड नाराजी आहे.

 

सध्या मतदारसंघात स्थानिकच उमेदवार असावा असे जनमत –

आजपर्यंत आपल्या काँग्रेस पक्षाने या मतदार संघाबाहेरील उमेदवार जनतेच्या माथी मारला आहे. यामुळेही जनता नाराज आहेत. सध्या या मतदार संघात स्थानिकच उमेदवार असावा असे जनमत आहे, आणि ते अधिकच बळावत आहे. त्यामुळे आता या दमतदार संघाबाहेरील उमेदवार जनता स्वीकारणारच नाही अशी सध्याची परिस्थिती आहे.

 

दोन वेळा बौद्ध समाजाला उमेदवारी अन काँग्रेसचा पराभव –

सन 2009 आणि सन 2014 या दोन वेळी शिवसेना पक्षाकडून बौद्ध समाजाला उमेदवारी मिळाल्याने समस्त बौद्ध समाजात प्रचंड चैतन्य निर्माण झाले, आणि याचाच परिणाम म्हणून तब्बल दोन वेळा सदर शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आणि काँग्रेस पक्षाला पराभव स्वीकारा लागला. सध्य परिस्थितीत असणारे विद्यमान आमदार साहेब हे अपवादाने विजयी झाले आहेत. त्याचे कारण वंचित बहुजन आघाडीचा 2019चा झंझावात.

त्यामुळे येत्या निवडणुकीत मतदार संघात आपल्या काँग्रेस पक्षाने अनेक वर्षे संधी नमिळालेल्या प्रामुख्याने स्थानिक आणि बौद्ध समाजातीलच होतकरू तरुणास अधिकृत उमेदवारी दिल्यास काँग्रेस पक्षाला त्याचा निश्चित फायदा होईल आणि आपल्या काँग्रेसचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होऊ शकतो.

म्हणूनच मी या 278 हातकणंगले या अनुसूचित जाती राखीव मतदारसंघासाठी उमेदवारीसाठी इच्छुक असून तरी मला किंवा वडगाव नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा माझी पत्नी सौ. स्वाती कराडे यांना आपल्या काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळावी अशी सविस्तर मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे टीळक भवन, मुंबई येथे केली आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अनुसूचित विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे, महाराष्ट्र राज्य प्रभारी रमेश चेन्नीथलानी, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेश निलोठिया, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार मा. वर्षाताई गायकवाड, माजी मंत्री नितीन राऊत, राज्य उपाध्यक्ष नाना गावंडे, कोल्हापूर काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव चांदुरकर, जिल्हाउपाध्यक्ष सुजितकुमार माळगे यासह यावेळी अनुसूचित विभागाचे राज्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.