समर्थ पाटील याची विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड
नवे पारगाव : तळसंदे (ता.हातकणंगले) येथील विश्ववारणा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा खेळाडू समर्थ मारुती पाटील यांने वारणा विद्यालय वारणानगर येथे झालेल्या शासकीय शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये १९ वयोगटामध्ये ११० मीटर हार्डल्स स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. त्याची पुढील विभागीय स्पर्धेत रत्नागिरी येथे एसव्हीजेसीटी चे क्रीडा संकुल डेरवण येथे निवड झाली आहे.
समर्थ याला विश्ववारणा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके-महाडिक,सचिव डी.पी.पाटील,मुख्याध्यापक व व्यवस्थापक दीपक महाडिक, संचालिका सौ.व्ही.डी. पाटील,डॉ.सौ.दिपिका महाडिक यांचे प्रोत्साहन लाभले तर जिमखाना प्रमुख प्रा.संभाजी पाटील,ज्युनियर विभाग प्रमुख सागर सुतार यांचे मार्गदर्शन लाभले, प्रशिक्षक कोच अभिजीत पवार,किशोर जाधव,यांचेसह संस्थेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.