Home कोल्हापूर जिल्हा मंत्री मुश्रीफाना इचलकरंजीची जनता माफ करणार नाही- इनामची निदर्शने,शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची...

मंत्री मुश्रीफाना इचलकरंजीची जनता माफ करणार नाही- इनामची निदर्शने,शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

मंत्री मुश्रीफाना इचलकरंजीची जनता माफ करणार नाही- इनामची निदर्शने,शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

 

 

इचलकरंजी,(प्रतिनिधी):- : इचलकरंजी शहरासाठी २०२० साली मंजूर झालेल्या सुळकुड पाणी योजनेची अद्याप अंमलबजावणी न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे त्यातच २७ मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदर योजना फिजीबल नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे, या वक्तव्याचा निषेधार्थ इचलकरंजी नागरिक मंचने आज महात्मा गांधी पुतळा येथे जोरदार निदर्शने केली.
पाणी आमच्या हक्काचे, मंजूर योजनेत खो घालणाऱ्या मंत्र्यांचा धिक्कार,इचलकरंजी शहराच्या पाणी योजनेचा १३ वर्षांपासून फुटबॉल करत असल्याबाबत तसेच शहरातील अनियमित पाणीपुरवठयाबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पर्याय नको सुळकुड पाहिजे तसेच
मंजूर योजनेत खो घालणाऱ्या व भूमिका बदलणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफना इचलकरंजीकर कधीच माफ करणार नाहीत,
राजकीय हस्तक्षेपातुन अधिकारी वर्गावर दबाव आणून नवनवीन मुद्दे उपस्थित करण्यात येत आहेत,सुळकुड योजना योग्य नव्हती तर मुश्रीफानी सुरवातीच्या काळात योजनेसाठी प्रयत्न का केले? तसेच पूर्वव्यव्हारता अहवाल का दिला?२१-२-२०२४ च्या जिल्हाधिकारी यांच्या अहवालात सगळे मुद्दे इचलकरंजी शहराच्या बाजूने असताना नदीकाठच्या गावाच्या सूचना व हरकती फेटाळल्या असुन लगेच शासकीय अधिकारी कुणाच्या दबावात भूमिका बदलतात त्याचे गौडबंगाल काय असाही प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
१५ तारखेच्या बैठकीत सुळकुड योजना अंमलबजावणीस परवानगी दिली नाही तर आंदोलन तीव्र करण्याबरोबरच शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा साठी वेळ प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Advertisements

आंदोलनात प्रसाद कुलकर्णी,उमेश पाटील,शशांक बावचकर,डॉ सुप्रिया माने,सुषमा साळुंखे,रुपाली माळी,अमित बियाणी,सुनील बारवाडे,राजु कोन्नुर,उदयसिंह निंबाळकर, अरुण बांगड,संभाजी सुर्यवंशी,अमोल ढवळे,राम आडकी,बाळु भंडारी,दीपक काणे,दीपक अग्रवाल,सुधीर मुचंडी,धनंजय सातपुते,अरुण हजारे,रवी बुगड,प्रकाश सुतार,उत्तम बुगड,विजय कांबळे,अनिल पोते,सतिश आमणे,धनंजय सातपुते, रियाज कोतवाल,दिपक लाटणे,अमोल मोरे,अमित पटवा,पंकज कोळी,अरिहंत पटवा,राजेश बांगड,अभिजित पटवा उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements