Home कोल्हापूर जिल्हा येणारी दिवाळी पहाट केशवराव भोसले नाट्यगृहात साजरी करूया- आम.राजेश क्षीरसागर

येणारी दिवाळी पहाट केशवराव भोसले नाट्यगृहात साजरी करूया- आम.राजेश क्षीरसागर

येणारी दिवाळी पहाट केशवराव भोसले नाट्यगृहात साजरी करूया- आम.राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर, (प्रतिनिधी): लोकराजा राजर्षी शाहूंच्या कला प्रेमाचे प्रतीक असणारे संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या महा संकटानंतर पुन्हा एकदा त्याच पूर्वीप्रमाणे उभे राहील यासाठी तमाम रंगकर्मीच्या आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन शासन युद्धपातळीवर कार्यरत आहे.त्यामुळे येणारी दिवाळी पहाट हा सांस्कृतिक कार्यक्रमाने नाट्यगृहात सादर करू या असे अभिवचन शिवसेना नेते आ.राजेश क्षीरसागर यांनी दिले.

केशवराव नाट्यगृहात सुरुवातीला पुर्नबांधणीच्या कार्यक्रमाची त्यांनी पाहणी करून सूचनाही केल्या. यावेळी कोल्हापूरच्या नाट्य कर्म तर्फे या पुर्नबांधणीसाठी अगदी अल्पावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रहाने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. राजेश क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी महानगरपालिका गटनेते सत्यजित उर्फ नाना कदम,नगरसेवक आदिल फरास यांच्यासह विविध रंगकर्मी उपस्थित होते.प्रांरभी प्रसाद जमदग्नी यांनी सर्वांचे स्वागत करताना एक पालक या नात्याने आ. क्षीरसागर यांनी अल्पावधीतच या कामाला गती देण्यासाठी व्यक्तिगत लक्ष घातले आहे.आणि हे नाट्यगृह पूर्ण सप्रेम यामध्ये पालक या नात्याने सक्रिय राहतील याबद्दल तमाम रंगकर्मीच्या वतीने कृतज्ञ म्हणून आम्ही त्यांचा हा औपचारिक सत्कार करत असल्याचे सांगितले.यावेळी राजप्रसाद धर्माधिकारी यांनीही मनोगत व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना आ.राजेश क्षीरसागर यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची दुर्घटना घडल्यानंतर एका आठवड्यातच घोषित केलेल्या निधीपैकी 25 कोटीचा निधी तात्काळ वर्ग करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी समाजाशी आपली असलेली समरसता आणि बांधिलकी कृतिशीलपणे व्यक्त केली आहे.केशवराव भोसले नाट्यगृह हे पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने आणि पूर्वी असेल त्याप्रमाणेच उभे राहील यासाठी आपण कटिबद्ध असून सर्व नाट्यकर्मीनीं यासाठी नियमित लक्ष देऊन वेळोवेळी सूचनाही कराव्यात असेही सांगितले. सर्वांचे आभार धनंजय पाटील यांनी मानले या औपचारिक सत्कार सोहळ्याच्या वेळी पद्माकर कापसे,सुनिल घोरपडे,कलाशिक्षक सागर बगाडे,नितिन सोनटक्के,गायक दिनेश माळी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.