हातकणंगले मधून अशोकराव माने यांचा दणदणीत विजय ; वडगावात कार्यकर्त्यांचा जल्लोष
पेठ वडगाव,(मोहन शिंदे) :- हातकणंगले (राखीव) विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे,जनसुराज्यचे दलितमित्र अशोकराव माने यांनी कॉग्रेसचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे व माजी आम.डॉ सुजित मिणचेकर यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला. अशोकराव माने हे हातकणंगले तालुक्यातून सुमारे 46 हजार 249 इतक्या मताधिक्याने निवडून आले.
महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे गट), जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्त्यांनी वडगावात छ.शिवाजी महाराज चौक , पालिका चौक बिरदेव चौक या ठिकाणी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात आला.
हि निवडणूक वडगावच्या राजकीय नेत्यांपेक्षा सामान्य कार्यकर्त्यांनीच हातात घेतली यामध्ये विजय शहा, सतोंष ताईगडे,डॉ.अभय यादव,अशोक सुर्यवंशी,शिंदे सेनेचे अक्षय मदने, अक्षय माने, दिनेष सणगर, चंद्रकांत सावर्डेकर, भाजपाचे जगन्नाथ माने, धनंजय गोंदकर, पियुष सावर्डेकर, प्रज्योत शहा, तय्यब कुरेशी, राजेंद्र जाधव, विकास कांबळे,राजू कवठेकर,राज भोपळे,धनाजी सूर्यवंशी,अक्षय माने,संपत दिंडे, कमलेश शिरवडकर, सागर भोसले,अमोल हुक्केरी, जवाहर सलगर,रमेश बेलेकर, रजनीकांत घोटणे,धनाजी माने, विशाल माने,रघुनाथ पिसे,राजकुमार मिठारी,संजय सूर्यवंशी, धनाजी गोसावी,गौरव तोरसकर, सलीम मुलानी, जगदीश महाद्दार,सौरभ शिंदे सागर साखळकर ,अमोल मकोटे,आशिष लोले, राजेंद्र बुरूड,सुजीत जोशी,हरी झगडे,अशोक माळी,अमर पाटील, विशाल माने,सुनील लाड, गणेश गायकवाड, सुप्रिया पाटील, अंजली अडसुळे, सुरेखा सुर्यवंशी, अर्चना भोपळे यांच्या अथक प्रयत्नामुळे वडगावात 1800 हुन अधिक मताधिक्य मिळविण्यात यश आले.
अशोकराव माने यांनी गेल्या पाच वर्षात मतदार संघात ठेवलेला जनसंपर्कामुळे सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळली होती. त्यामुळे हातकणंगलेच्या जनतेला बदल हवा विकास कामाचा आमदार नवा पाहिजे होता आणि हे वडगाव सह परिसरातील गावांनी करून दाखवले. हातकणंगले मतदारसंघात सुरुवातीपासूनच अशोकराव माने यांना प्रत्येक फेरीला हजारांचे मताधिक्य मिळत गेले.
महायुतीचे जनसुराज्यचे अशोकराव माने यांना 1 लाख 34 हजार 191 मते मिळाली तर मविआ चे उमेदवार विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांना 87942 इतकी मते मिळाली. आणी स्वाभिमानी शेतकरी ससंघटनेचे उमेदवार डॉ.सुजित मिणचेकर यांना 24952 इतकी मते पडल्याने दोघांनाही परभावचा सामना करावा लागला.
विजयानंतर अशोकराव माने यांनी खासदार धैर्यशील माने यांच्या घरी जाऊन आभार मानले. तसेच शिरोली येथे नुतन आमदार अमल महाडिक, वारणा येथे आमदार विनय कोरे यांच्या रात्री भेटी घेतल्या.
🔲 कार्यकर्त्यांचा विजय- – –
हातकणंगले विधानसभेचे महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांच्या प्रचारास वडगावात काही राजकीय नेते यांनी पुढाकार न घेतल्यामुळे वडगावातील सामान्य कार्यकर्त्यांनी हि निवडणूक हातात घेतली आणी अशोकराव माने यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले. आणी सामान्य कार्यकर्त्यां विजय खेचून आणू शकतो हे वडगावात दाखवून दिले.