खोची येथील भैरवनाथ देवाचा शनिवारी जन्मोत्सव सोहळा
खोची,(भक्ती गायकवाड):- महाराष्ट्र कर्नाटकातील भाविकांचे आराध्य दैवत,जागृत देवस्थान व खोची ता.हातकणंगले ग्रामस्थांचे ग्रामदैवत श्री.भैरवनाथ देवाचा जन्मोत्सव सोहळा शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजता संपन्न होणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र,कोल्हापूर यांच्या अधिपत्याखालील श्री.भैरव देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती,खोची ग्रामस्थ व गुरव,गोसावी,नाथ समाज यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ६ श्री.भैरवनाथ जोगेश्वरी ग्रंथाचे पारायण,सायंकाळी ६ ते रात्री २ महाप्रसाद,रात्री ८.३०ते ९.३० श्री ची आरती,रात्री ९ ते १२ विठ्ठल भजनी मंडळ,खोची यांचा भजनाचा कार्यक्रम. रात्री बारा ते साडेबारा जन्मसोहळा. रात्री साडेबारा ते साडेतीन सचिन लोहार,सावर्डे ता.कागल प्रेझेंटस् आधुनिक संगीत भजनाचा कार्यक्रम.पहाटे साडेतीन ते साडेचार महाभिषेक,पहाटे साडेचार ते साडेसहा महापूजा.रविवारी सकाळी साडेसहा ते साडेसात आरती.तसेच यानिमित्त कालभैरव अष्टक पठण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी श्री.दत्त डेकोरेशन,आंबेवाडी यांचे सहकार्य लाभणार आहे.तरी सदर जन्मोत्सव सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान सल्लागार उपसमिती,ग्रामस्थ,सालकरी पुजारी समस्त गुरव-गोसावी-नाथ डवरी समाज यांनी केले आहे.