Home Breaking News मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी ; निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांची...

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी ; निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांची सुचना

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी ; निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांची सुचना

 

 

हेरले,(प्रतिनिधी) : प्रत्यक्ष मतदान केंद्रावर कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित प्रशिक्षण सत्रांमध्ये जे प्रशिक्षण दिले जात आहे. ते अगदी मनापासून व शांतपणे आत्मसात करावे जेने करून प्रत्यक्ष मतदाना दिवशी कोणत्याही अडचणी शिवाय मतदान प्रकिया सुरळीतपणे पार पाडता येईल. लोकशाही मजबूत करण्यासाठी शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन २७८ हातकणंगले विधानसभा (अ.जा)मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी केले. ते संजय घोडावत विद्यापीठामध्ये आयोजित २७८ हातकणंगले विधानसभा (अ.जा.) मतदार संघाच्या वतीने आयोजित पहिले प्रशिक्षण प्रसंगी बोलत होते.

निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम पुढे म्हणाले सर्व मतदान केंद्रावरती नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर प्रशासन प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन व सहकार्य करीत राहील. प्रशिक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी मनामध्ये किंतू-परंतू न ठेवता आपल्या शंकाचे निरसन अधिकाऱ्यांकडून घ्यावे व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी.

संजय घोडावत विद्यापीठामध्ये शनिवार दि.२६ व रविवार दि.२७ ऑक्टोबर रोजी दोन सत्रामध्ये प्रशिक्षण आयोजीत केले आहे. शनिवार सकाळच्या सत्रांमध्ये मतदान अधिकारी प्रशिक्षणार्थी केंद्राध्यक्ष – (८२)क्रमांक एक मतदान अधिकारी (११३ ) क्रमांक दोन व क्रमांक तीन मतदान अधिकारी ( २१४ ) सह एकूण ३९९ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.दुसऱ्या सत्रांमध्येही – ३९९ पैकी वरील संख्येप्रमाणेच मतदान अधिकारी उपस्थित होते. दोन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये एकूण १५९२ मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.प्रथम दिनी दोन्ही सत्रातील प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले.

या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार सुशिल बेल्हेकर,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी अजय नरळे, निवडणूक नायब तहसिलदार संजय पुजारी, निवासी नायब तहसिलदार संदीप चव्हाण,मणुष्यबळ व्यवस्थापक सुरेश बन्ने, गटशिक्षणाधिकारी रवींद्रनाथ चौगले आदींचे मार्गदर्शन लाभले.