तळसंदे कुस्ती मैदानात पैलवान विक्रम शेटे विजयी

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    तळसंदे कुस्ती मैदानात पैलवान विक्रम शेटे विजयी

     

     

     

    पेठ वडगाव :- तळसंदे ता.हातकलंगले येथे हजरत पीर शहाजाद वली साहेब उरसानिमित्त घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात इचलकरंजीच्या पैलवान विक्रम शेटे ने प्रथम क्रमांकाच्या कुस्ती मैदान मारले .
    .
    मैदान पूजन माजी सरपंच रंगराव पाटील, उपसरपंच संतोष सुवासे माजी उपसरपंच महेश कुंभार ,माजी सरपंच अमरसिंह पाटील, पोपट पाटील यांच्या हस्ते झाले .
    मैदानात लहान मोठ्या अशा दीडशे कुस्त्या झाल्या . विक्रम शेटे इचलकरंजी, रणजीत राजमाने इचलकरंजी अविनाश चव्हाण, हर्षराज पाटील , निखिल कोळी, समर्जीत पाटील, प्रेम सुवासे ,राजवीर जाधव यांनी मैदान गाजवणाऱ्या चटकदार कुस्त्या करून प्रतिस्पर्ध्यावर मात केली तर प्रसाद सासणे व प्रथमेश गुरव यांची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली
    पंच म्हणून वस्ताद संदीप पाटील शिवाजी मोहिते ,प्रकाश वळीवडे, महादेव भोसले, महादेव चव्हाण, राजू वळीवडे ,अनिल कोळी ऋषिकेश पाटील यांनी काम पाहिले विजयी मल्लांना मा पोलीस पाटील हौसेराव पाटील माजी उपसरपंच मनोहर चव्हाण तळसंदे वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन यशवंत पाटील तळसंदे पारगाव पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन बाबासाहेब चव्हाण तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष मोहिते सदस्य कृष्णात चव्हाण व ग्रामपंचायतचे सदस्य उदय लोहार यांच्या हस्ते रोख रक्कम ,शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले ईश्वरा पाटील यांनी निवेदन करून मैदानामध्ये उत्साह निर्माण केला .नामांकित तालमीच्या वस्तादंचा यावेळी सत्कार करण्यात आला .

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements