Home कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी विधानसभेसाठी भाजप कडुन राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर

इचलकरंजी विधानसभेसाठी भाजप कडुन राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर

इचलकरंजी विधानसभेसाठी भाजप कडुन राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर

 

कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने स्थानिक पातळीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.स्थानिक विकासाच्या मुद्द्यांना अग्रक्रम देत, समाजातील सर्व घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे त्यांचे संकल्प आहे. राहुल आवाडे यांनी कमी वयातच जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. त्यांनी निवडणुकीत दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यावर भर देत, समाजाच्या समस्या सोडवण्याची दिशा ठरवली आहे.

त्यांनी याआधीच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून, त्यांच्या तरुण नेतृत्वामुळे तरुण वर्गात प्रचंड लोकप्रियता आहे. भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.