Home कोल्हापूर जिल्हा गडमुडशिंगी येथे मंदिर विहरीत कोसळून एकाचा मृत्यू

गडमुडशिंगी येथे मंदिर विहरीत कोसळून एकाचा मृत्यू

गडमुडशिंगी येथे मंदिर विहरीत कोसळून एकाचा मृत्यू

 

 

कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-गडमुडशिंगी या ठिकाणी विहिरीच्या काठावर असणारे मंदिर विहिरीत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटणेत कृष्णात उमराव दांगट हे पूजा करीत असताना मंदिर पाण्यात कोसळलं. त्यात कृष्णात उमराव दांगट यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.

गडमुडशिंगी येथे विहिरीच्या काठावर एक छोटं नृसिंह मंदिर उभारण्यात आलं होतं. 20 ते 22 वर्षांपूर्वीच हे जुनं मंदिर असल्याची माहिती आहे. येथील दांगट परिवाराचे कुलदैवत असल्यामुळे दांगट कुटुंबिय हे नित्यनियमाने या मंदिरात पूजा करीत होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कृष्णात यांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.