कुंभोज चौकात माणसं कमी व भटकी कुत्री जास्त, ग्रामपंचायत गप्प का..?
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे ):-कुंभोज तालुका हातकणंगले येथे सध्या छत्रपती शिवाजीनगर, छत्रपती शाहू नगर इंदिरानगर व गावभाग परिसरात कुंभोज परिसरात असणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील नगरपालिका व महानगरपालिका तसेच परिसरात असणाऱ्या नामांकित शिक्षण संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून ती पकडली जातात व सदर सर्व कुत्री कुंभोज सह परिसरात सोडली जात असल्याचे चित्र सध्या दिसत असून, कुंभोज चौकात माणसं कमी व भटकी कुत्री जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
याबाबत मध्यंतरी हातकणंगले तालुक्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेची गाडी ही कुंभोज ग्रामस्थांनी पकडली होती .परिणामी इतके सर्व होत असताना कुंभोज ग्रामपंचायत सदस्य शिक्षण संस्था व नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्यावर कायदेशीर गुन्हा का दाखल करत नाही असा सवाल कुंभोज ग्रामस्थातून व्यक्त होत असून, सदर भटक्या कुत्र्यांचे प्रमाण सध्या कुंभोज मध्ये पाहता 1000 पेक्षा जास्त भटक्या कुत्राचा वावर सध्या कुंभोज मध्ये वाढला आहे . परिणामी त्यामधील अनेक कुत्री दररोज रस्त्यावरती मरून पडल्याचे चित्र दिसत असून परिसरात सध्या दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे सदर भटक्या कुत्र्यांना खाण्यासाठी काही उपलब्ध होत नसल्याने सदर भटकी कुत्री अनेक ठिकाणी घरामध्ये प्रवेश करत असून काही ठिकाणी विद्यार्थी व महिलांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न करत आहेत परिणामी ही घटना अनेक वेळा होऊन सुद्धा ग्रामपंचायत कुंभोज याबाबतीत शांत का ?
हा सवाल ग्रामस्थातून उपस्थित होत असून परिसरातून काही नगरपालिका व महानगरपालिका सदर भटकी कुत्री पकडून ते कुंभोज परिसरात सोडत असल्याचे अनेक नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. याबाबत सदर नगरपालिका व महानगरपालिका यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करून कुंभोज ग्रामपंचायतने सदर भटकी कुत्री कुंभोज परिसरात सोडण्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सध्या परिसरातून जोर धरत आहे.