मनपाडळे गावचा सौरभ सूर्यवंशी याची इंडियन आर्मी टेक्निशियन विभाग मध्ये निवड

    मनपाडळे गावचा सौरभ सूर्यवंशी याची इंडियन आर्मी टेक्निशियन विभाग मध्ये निवड

     

     

    पेठ वडगाव : मनपाडळे ता.हातकणंगले येथील सौरभ संपतराव सूर्यवंशी याची इंडियन आर्मी टेक्निकल विभागात पहिल्या पाच मध्ये निवड झाली.                मित्रांनी तसेच घरातील सर्वांनी व गावातील व इतर भागातील सर्व मित्रांनी त्याचे जंगी मिरवणूक काढली. खरंतर ह्या यशाचे कारण सौरभची जिद्द चिकाटी व प्रामाणिक प्रयत्न हेच आहेत. तसेच त्याबरोबर त्याची आई, पप्पा व भावाची यांची साथ मोलाची मिळाली.

    एका गरीब घरातील जन्मलेल्या सौरभ चे वडील सेंट्रींग कॉन्टॅक्टर संपतराव सूर्यवंशी आई वंदना सूर्यवंशी, घरकाम व भाऊ सोहम सूर्यवंशी याला नुकतीच बी टेक डिग्री मिळाली.

    सौरभ हा कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सहकार सेल जिल्हाध्यक्ष संजय शिंदे यांचा भाचा आहे.तसेच शिवतेज प्रतिष्ठाण मनपाडळे यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय शिंदे, पाडळी गावचे पोलीस पाटील अकबर पठाण, विजय कुरणे सतीश कुरणे, विश्वास खोत, आमदार राजू बाबा आवळे, विजयसिंह यादव महाविद्यालय पेठ वडगाव यांच्या वतीने प्राचार्य व संस्थेच्या स्थापने व विद्यार्थ्यांनी सत्कार करण्यात आला. तसेच एनसीसी भवन कोल्हापूर येथे एनसीसी प्रमुख यांनी सत्कार केला. तसेच वडगाव पंचक्रोशीतील सर्व गावातील तरुण मंडळ पतसंस्था दूध संस्था यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सौरभ सूर्यवंशी हा ट्रेनिंग साठी मनपाडळे येथुन ओडिसाला रवाना होणार आहे.