तालुका विधी सेवा समिती वतीने जेष्ठ नागरिकांना कायदेविषयी मार्गदर्शन
पेठ वडगाव,(प्रतिनिधी):- राज्यात एक आक्टोंबर हा जागतिक जेष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा होतो.
याचेच औचित्य साधुन पेठ वडगाव येथे तालुका विधी सेवा समिती वतीने जेष्ठ नागरिकांना कायदेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बोलताना वडगाव सहदिवाणी न्यायाधीश क.स्तर एस.डी.सोनवणे म्हणाले, जेष्ठ नागरिक हे समाजाला मार्गदर्शक म्हणून काम करत असतात तरी देखील त्यांना कायदेशीर अडचणी आल्या तरी त्यानी तालुका विधी समिती कडे दाद मागावी.
याप्रसंगी एड.विवेक कमलाकर,डॉ.विश्वंभर काटकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्री गणेश ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळ अध्यक्ष नारायण रणसिंगे, उपाध्यक्ष चंद्रकांत क्षिरसागर, सचिव सुकुमार कदम, सहसचिव विवेक आयरेकर, कोषाध्यक्ष अजित पाटील, खजिनदार बाबुराव सणगर ,सदस्य चिकबिरे सर, जाधव सर ,बादल सर, चौगुले मॅडम, डॉ.पोरे मॅडम, डंबे सर यांचेसह भादोले, लाटवडे, चावरे, अंबप येथील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार विकास आयरेकर यांनी मानले.