सुकन्या समृद्धी योजनेची निलेवाडीत प्रभावीपणे अंमलबजावणी
नवे पारगाव : निलेवाडी तालुका हातकणंगले येथे ग्रामपंचायतीच्या वतीने एक एप्रिल 2023 पासून पुढे जन्मले ल्या गावातील सर्व मुलींच्या नावे रुपये 2000 21 वर्ष मुदतीने ठेवण्यात आली सुकन्या समृद्धी योजना या योजने अंतर्गत ही पोस्ट ऑफिस जुने पारगाव या ठिकाणी ठेवण्यात आली यामध्ये दुर्वा अमोल मोहिते ईश्वरी संदीप भोसले अनन्या शरद शेळके राही संग्राम घाटगे रेवा मयूर जाधव अद्विका स्वप्नील खोत रिया अनिल गोंडे जिजा विशाल बागडी त्रिशा राहुल बागडी या मुलींच्या पालकांना दोन हजार रुपये ची ठेव पावती समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमासाठी सरपंच माणिक घाटगे उपसरपंच शहाजी बोरगे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष भापकर ग्रामपंचायत सदस्य बबनराव टोपूगडे अमर घाटगे सदस्या स्वाती जाधव ,शारदा शिंदे, सुनिता मोहिते, तेजश्री खोत , राणी कोरे ग्रामसेविका अनुपमा सिदनाळे पोस्ट ऑफिस
च्या ऐश्वर्या सुगंधी उपस्थित तसेच सुकन्या समृद्धी योजनेचे लाभार्थी व त्यांचे पालक होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक सदस्य बबन टोपूगडे यांनी केले तर आभार अमर घाटगे यांनी मानले