कोरोची गावच्या घन कचरा नियोजनाची जबाबदारी माझी-राहुल आवाडे

    कोरोची गावच्या घन कचरा नियोजनाची जबाबदारी माझी-राहुल आवाडे

     

    कुंभोज,प्रतिनिधी ( विनोद शिंगे):-आमदार प्रकाश आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून कोरोची गावच्या विकास कामांसाठी आज पर्यंत जो निधी मंजूर करून दिल्या बद्दल व गावच्या घन कचरा नियोजनाची जबाबदारी घेतल्या बद्दल कोरोची ग्राम पंचायतीच्या वतीने मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांचा सत्कार करण्यात आला.
    यावेळी सरपंच संतोष भोरे, हातकणंगलेच्या नगराध्यक्षा अर्चना जानवेकर, उपसरपंच पूजा टेळे, शीतल पाटील, संजय शहापुरे, संगीता मगदूम, स्नेहल कोरोचीकर, हलीमा सनदी, राजकुमार चावरे, आरती कुंभार, विकी माने, संगीता शेट्टी, अश्विनी चव्हाण, आनंदा लोहार, आनंदी आमटे, कोमल कांबळे, सतीश सूर्यवंशी, बंडा पाटील, दिपक तेली, विनायक बचाटे, अभिनंदन पाटील, अमर कोरोचीकर, यांच्यासह पत्रकार व नागरिक उपस्थित होते.