पारगाव येथील दत्त नागरी पतसंस्थेस ९.८५ लाखांचा नफा – प्रभाकर साळुंखे 

    पारगाव येथील दत्त नागरी पतसंस्थेस ९.८५ लाखांचा नफा – प्रभाकर साळुंखे

     

     

    नवे पारगाव  : कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या नवे पारगाव येथील दत्त नागरी सहकारी पतसंस्थेस ९ लाख ८५ हजार रुपयांचा नफा झाला असून सभासदांना ९ टक्के लाभांश देणार असल्याची घोषणा संस्थापक प्रभाकर साळुंखे यांनी केली.

    नवे पारगांव (ता. हातकणंगले) येथील दत्त नागरी सहकारी पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी संस्थापक श्री साळुंखे बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन आप्पासाहेब हुजरे होते.

    प्रारंभी उपस्थित ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते दत्त प्रतिमेचे व (कै) शंकराव साळुंखे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन झाले. उपाध्यक्ष संजय पाटील यांनी स्वागत प्रस्ताविक करून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.

    श्री. साळुंखे म्हणाले, पतसंस्थेच्या वाठार, ताराबाई पार्क व कळंबा कोल्हापूर या शाखा संगणकीकृत आहेत. २६ कोटी ५५ लाख ठेवी असून १७ कोटी ८ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. ९ कोटी ६ लाखाची गुंतवणूक आहे. दत्त सभागृह, शुद्ध पिण्याचे पाणी, झेरॉक्स, आरटीजीएस, एनएफटी या सेवा माफक दरात दिल्या जात असून लवकरच कोअर बॅंकींग सिस्टीम सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे श्री साळुंखे, श्री हुजरे यांनी दिली.

    व्यवस्थापक शरद जमदाडे यांनी विषय वाचन व अहवाल वाचन केले. सभासदांना ११ हजार रुपयात सभागृह व बिगर सभासदांना १७ हजार रुपये सभागृहाचे भाडे घेण्यासह सर्व विषय सभासदांनी मंजूर केले.

    सभासदांचे गुणवंत पाल्य श्रेयश राहूल जगदाळे, श्रृती मनोज पाटील, रिया रविंद्र तोडकर, सायली विजय पाटील यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. वाठार शाखाध्यक्ष कृष्णात बोरुडे, ताराबाई पार्क व कळंबा कोल्हापूर शाखाध्यक्ष बी. डी. पाटील, संचालक नंदकुमार मराठे, राजेंद्रकुमार पाटील, भारती जाधव, प्रकाश पाटील, जयसिंग पाटील, बाबुराव चौगुले, संतोष जाधव, वैभव कुंभार, उपसरपंच निवास पाटील, रामचंद्र पाटील, संभाजी चरणे, शकील पठाण, पोपट हुजरे यांच्यासह सभासद उपस्थित होते. संचालक सुर्यंकात शिर्के यांनी आभार मानले.