कबनुर येथे ताराराणी पक्षाच्या वतीने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न
ताराराणी पक्ष व महिला आघाडीच्या वतीने इंदिरा मंगल कार्यालय, कबनूर येथे आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचा शुभारंभ सौ. मोश्मी आवाडे वहिनी यांच्या हस्ते माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला*.
आपल्या घराला घरपण देताना हा प्रपंचीक गाडा सांभाळताना महिला नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात. माहेर, सासर यातील त्या भक्कम दुवा असतात. त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही तरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला भगिनींसाठी व्हावेत म्हणून निवेदक विवेक व वीणा यांच्या सोबत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
*या कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक फ्रिज सौ. शिवानी हिरेमठ, द्वितीय क्रमांक ३२” टीव्ही संगीता रावळ तसेच पैठणीचे विजेते पूजा कोल्हापुरे, पूनम पाटील, तस्मिया शेखजी, निशा दिमान या महिलांना पैठणी असे विजेत्यांनी अनुक्रमे हि बक्षीसे पटकावली. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना लकी ड्रॉ व स्पॉट गेम ५० प्रेशर कुकर मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते सर्व महिला भगिनींना देऊन गौरविण्यात आले*.
यावेळी ताराराणी महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड, सरपंच शोभा पोवार, कबनूर ताराराणी महिला अध्यक्ष वैशाली कदम, ग्रा.पं सदस्या सुनिता आडके, ग्रा.पं.सदस्या स्वाती काडाप्पा, ग्रा.पं.सदस्या सुलोचना कट्टी, ताराराणी महिला आघाडी कार्याध्यक्षा नजमा शेख, वर्षा पाटील, सोनाली तारदाळे, शैलजा पाटील, मेघा भाटले, गिरीजा हेरवाडे, सपना भिसे, मंगल सुर्वे, नंदा साळुंखे, सीमा कमते, जयश्री शेलार, अंजुम मुल्ला, दुडगे भाबी, दिपाली लोटे, शोभा कापसे, राधिका तरलकर, मेघा माने, जेवरबानू दुंडगे, वाणी मावशी, अनिता जाधव, शोभा घाटगे, शोभा शिरुडकर, धनश्री कापसे, रुक्साना झारे, नजराना फकीर, शबाना इंगळे, सरिता शिंदे, रुपाली क्षीरसागर, जुगळे भाभी, कल्पना पाटील, आसमा आवटी, रिहाना सनदी, कबनूर चे उपसरपंच सुधीर लिगाडे, जवाहर बँकेचे संचालक बबन केटकाळे, ग्रा.पं.सदस्य मधुकर मणेरे, माजी उप सरपंच निलेश पाटील, ग्रा.पं.सदस्य समीर जमादार, संजय कट्टी, दत्ता मांजरे, सुनील हळदकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी विनोद शिंगे कुंभोज