मौजे वडगाव कामधेनू दुध संस्थेत जयशिवराय पॅनेल विजयी संयुक्त आघाडीचा धुव्वा उडवित सर्व १३ जागा जिंकून सत्तांतर
हेरले / (प्रतिनिधी):-हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील कामधेनू दुध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली . यामध्ये जयशिवराय पॅनेलने संयुक्त आघाडीचा धुव्वा उडवित सर्व १३ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित केले .
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन.पी. दवडते व त्यांचे सहकारी यांनी काम पाहिले . जयशिवराय पॅनेल मधील विजयी उमेदवार व कंसात मिळालेली मते पुढील प्रमाणे सर्वसाधारण उमेदवार रावसाहेब चौगुले ( २८९ ) दगडू कदम ( २५९ ) धोंडिराम काकडे ( २५० ) प्रकाश चौगुले ( २५५ ) भिमराव चौगुले ( २५२ ) अमोल झांबरे ( २६४ ) अनिल सावंत ( २६० ) अमिरहमजा हजारी ( २५४ ) स्त्री राखीव जयश्री चौगुले ( २७६ ) पुजा चौगले ( २६२ ) इतर मागासवर्ग विनोद शेटे ( २९१ ) अनु जाती दत्तात्रय कांबळे ( ३१८ ) भटक्या वियुक्त जाती शिवाजी भेंडेकर (२७७ ) अशी मते घेऊन १३ उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर ५० ते ६० मतांनी विजय संपादन केला .
या आघाडीचे नेतृत्व श्रीकांत सावंत , ॲड विजय चौगुले , सतिश वाकरेकर, सुनिल खारेपाटणे , अविनाश पाटील , स्वप्नील चौगुले , आदींनी केले .
या संस्थेची १३ जागेसाठी निवडणूक झाली . मतदान १६ जून रविवारी ८ ते ३ या कालावधीत झाले . याच दिवशी तात्काळ मतमोजणी करूण सायंकाळी निकाल घोषित झाल्यानंतर विजयी जयशिवराय पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत व फटाक्याची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला .
🔲—-
भटक्या विमुक्त जागेवर हातकणंगले काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य डॉ . विजयकुमार गोरड यांचा शिवाजी भेंडेकर या नवख्या मेंढपाळाने ५२ मतांनी धक्कादायक पराभव केला .
डॉ विजयकुमार गोरड यांना २२५ मते तर शिवाजी भेंडेकर यांना २७७ मते पडली .